Sudha Murthy: आईला पद्मभूषण पुरस्कार मिळाला तो क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा; ब्रिटेनच्या फर्स्ट लेडी अक्षता सुनकही भारावल्या

भारतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले
Sudha Murty News:
Sudha Murty News: Sarkarnama
Published on
Updated on

Sudha Murty News: ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला ब्रिटेनच्या फर्स्ट लेडी आणि सुधा मुर्ती यांची मुलगी अक्षता सुनक यादेखील उपस्थित होत्या. अक्षता सुनक यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आई सुधा मूर्ती आणि वडील नारायण मूर्ती (इन्फोसिसचे सह-संस्थापक) यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

"माझ्या आईला तिच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला, तो क्षण माझ्यासाठी मोठा अभिमानाचा होता. गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय महिला दिनी, मी माझ्या आईच्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित ते कथाकथनापर्यंतच्या विलक्षण प्रवासावर विचार केला, परंतु तिचे सेवाभावी आणि स्वयंसेवक राहण्याचा प्रयत्न माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असल्याचं अक्षता सुनक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sudha Murty News:
Karnataka Assembly Election : ‘शिवकुमारांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली’: दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी

त्याचवेळी ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील आपल्या सासूबाईंना मिळालेल्या पुरस्कारावर ''गर्वाचा दिवस'' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षता सुनक यांच्या पोस्टला त्यांनी रिप्लाय केला आहे. अक्षता मूर्ती या ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत.

आईला हा पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षता मूर्ती यांनी गुरुवारी ट्विटरवरही अशीच पोस्ट केली आहे. " काल माझ्या आईला भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा होता, जो मला शब्दात व्यक्त करता येणार नाही गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनी, मी माझ्या आईच्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित ते कथाकथनापर्यंतच्या विलक्षण प्रवासाचे प्रतिबिंबित केले, परंतु तिचे सेवाभावी आणि स्वयंसेवक प्रयत्न माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहेत," अक्षता यांनी लिहिले.

तसेच, साक्षरता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि नैसर्गिक आपत्तीनंतर देशातील दुर्गम भागात राहणाऱ्यांना तात्काळ मदत देणे, अशा अनेक मार्गांनी आपल्या आईने लोकांना मदतीचा हात दिला आहे.आईच्या याच कामांमधून स्वयंसेवक बनण्याची, शिकण्याची आणि ऐकण्याची प्रेरणा आम्हाला दिली आहे. असही अक्षता सुनक यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com