Union Budget 2024 : मोदींनी समुद्रकिनारी केलेल्या फोटोशुटचा ‘इम्पॅक्ट’ बजेटवरही...

Finance Minister Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरूवारी लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. बजेटला मिळाली मंजुरी...
Union Budget 2024
Union Budget 2024 Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी लक्षद्वीप बेटांवर जाऊन समुद्रकिनारी फेरफटका मारला. पण त्यानंतर जे राजकारण झालं ते संपूर्ण जगानं पाहिलं. मोदींचे तिथले फोटो सोशल मीडियात व्हायरल होताच मालदीवमधील काही मंत्र्यांनी मोदींबद्दल अपशब्द काढले. मग अनेकांनी मालदीववर बहिष्कार घातला. त्यावरून दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्याचे पडसाद बजेटवरही उमटल्याचे दिसते. (Union Budget 2024)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी गुरूवारी लोकसभेत अंतरिम बजेट सादर केले. त्यांनी 56 मिनिटांच्या भाषणात मोदी सरकारने (Modi Government) मागील दहा वर्षांत केलेल्या कामगिरी आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर हे बजेट सादर होत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष त्याकडे होते.

Union Budget 2024
Union Budget 2024 live : मोदी सरकारचा जबरदस्त कॉन्फिडन्स; टॅक्समध्ये कोणताही बदल नाही...

लक्षद्वीपकडे अधिक लक्ष

पंतप्रधान मोदी काही दिवसांपुर्वी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी समुद्रकिनारी फिरत फोटो काढले. चालताना, पुस्तक वाचताना, समुद्राकडे पाहतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. लक्षद्वीपमधील निसर्गसौंदर्य डोळे दिपवणारं होतं. पण हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या मालदीवमधील सत्ताधारी नेत्यांनी मोदींवर टीका केली. त्यानंतर मात्र मालदीव बहिष्कार टाकण्याची लाटच आली. अनेकांनी तेथील बुकिंग कॅन्सल केली. लक्षद्वीपमध्ये जाण्याला प्राधान्य दिले. काही दिवसांतच तेथील पर्यटनावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मालदीव विरूध्द भारत हा वाद चांगलाच पेटला होता. त्याचे पडसाद बजेटवरही दिसले आहे. सीतारमण यांनी पर्यटनाला अधिकाधिक प्राधान्य देण्याची जाहीर केले आहे. लक्षद्वीपला अधिक प्राधान्य दिले जाणार असून इतर बेटांच्या विकासावरही भर दिला जाईल. पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर दिला जाईल. स्थानिक पर्यटनाला चालना देण्याबाबत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात संकेत दिले.

करामध्ये बदल नाही

सीतारमण यांनी करप्रणालीमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाची काहीप्रमाणात निराशा झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर करामध्ये बदल होईल, असे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे सीतारमण यांनी काही महत्वाच्या घोषणा करत महिला, तरूण, गरीबांसाठी योजना जाहीर केल्या आहेत.

Union Budget 2024
India Budget 2024 : 'महागाई तितकीशी वाढली नाही, लोकांचे उत्पन्न वाढले'; सीतारमण यांचा दावा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com