By Election Result 2024: लोकसभेनंतर पोटनिवडणुकीतही 'इंडिया' आघाडीच 'किंग'; भाजपला झटका, 7 राज्यांत अवघ्या 2 जागा

By Election Result 2024 Updates : 7 राज्यांतील 13 जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. यात भाजपला झटका बसला आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं मोठी आघाडी घेतली आहे.
narendra modi rahul gandhi.jpg
narendra modi rahul gandhi.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'नं काँग्रेस प्रणित 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का दिला होता. यातच एक महिन्यानंतर झालेल्या सात राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यात काँग्रेससह 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

13 पैकी 10 ठिकाणी 'इंडिया' आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपला फक्त 2 जागा जिंकता आल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील 4, हिमाचल प्रदेशमधील 3, उत्तराखंडमधील दोन आणि मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि तामिळनाडूतील एक अशा मिळून 13 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात पश्चिम बंगालमधील चारही जागांवर तृणमूल काँग्रेसनं ( TMC ) एकहाती विजय मिळवला आहे. उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर काँग्रेसनं दमदार बाजी मारली आहे.

narendra modi rahul gandhi.jpg
Nitin Gadkari : ...तर 2027 मध्ये पुन्हा भाजप सरकार? गडकरींनी CM सावंतांना दिले महत्वाचे काम !

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा ( Congress ) दोन, तर भाजपचा एक जागेवर विजय झाला आहे. बिहारमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. तर, तामिळनाडूत द्रमूकच्या ( डीएमके ) उमेदवारानं 'पीएमके'च्या उमेदवाराचा पराभव केला आहे. पंजाबमध्ये एका जागेवर आपनं भाजपवर मात करत विजय खेचून आणला आहे. तर, मध्य प्रदेशातील एका जागेवर झालेल्या लढतीत भाजपनं काँग्रेसला पराभूत केलं आहे.

narendra modi rahul gandhi.jpg
Rahul Gandhi News : स्मृती इराणींबाबत अपमानस्पद टिप्पणी करणाऱ्यांना राहुल गांधींची 'Warning', म्हणाले..

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या होत्या. तर, 'एनडीए'ला 294 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दुसरीकडे काँग्रेस 2014 आणि 2019 नंतर पहिल्यांदा 100 च्या आसपास पोहोचली आहे. 'इंडिया' आघाडीला 234 जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com