Canada Election : भारताच्या शत्रूचा कॅनडात दारूण पराभव; जगमीत सिंहच्या पक्षाचा सुपडा साफ

Who is Jagmeet Singh? Background on the Khalistani-Linked Leader : जगमीत सिंह याचा कॅनडात नॅशनल डेमोक्रेटिक पक्ष आहे. या पक्षाला निवडणुकीत केवळ आठ जागा मिळण्याची शक्यता आहे.
Jagmeet Singh Canada
Jagmeet Singh CanadaSarkarnama
Published on
Updated on

Election Results : कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भारतासाठीही या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. खलिस्तानी समर्थक नेता जगमीत सिंह याचा निवडणुकीत पराभव झाला असून पक्षाचाही सुपडा साफ झाला आहे. या धक्क्यामुळे त्याने पक्षाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कॅनडामध्य सत्तांतर होणार, हे स्पष्ट आहे.

जगमीत सिंह याचा कॅनडात नॅशनल डेमोक्रेटिक पक्ष आहे. या पक्षाला निवडणुकीत केवळ आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षाने सर्व 343 जागांवर उमेदवार उतरवले होते. मागील निवडणुकीत 2021 मध्ये सिंहच्या पक्षाला 24 जागा मिळाल्या होत्या. पक्षाला 12 ही जागा न जिंकता आल्याने राष्ट्रीय दर्जाही जाणार आहे. हा निकाल म्हणजे कॅनडातील खलिस्तानी समर्थकांना मोठा हादरा मानला जात आहे.

Jagmeet Singh Canada
Rahul Gandhi News : दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधींचे मोदींना पहिल्यांदाच पत्र; मागणी मान्य केल्यास संसदेत 'पहलगाम' गाजणार

निवडणुकीत जगमीत सिंहचा बर्नानी सेंट्रल मतदारसंघात दारूण पराभव झाला आहे. त्याला 27.3 टक्के मतांवर समाधान मानावे लागले. लिबरल पक्षाच्या उमेदवाराने सुमारे 40 टक्के मते मिळवत मतदारसंघावर नाव कोरले. सिंहची ही तिसरी निवडणूक होती. जगमीत सिंह यांची कॅनडाच्या संसदेत महत्वाची भूमिका राहिली होती. त्यांनी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी पाठिंबा काढून घेतला होता.

दरम्यान, निवडणुकीत सत्ताधारी लिबरल पक्षाने निसटता विजय मिळवला आहे. अद्याप कोणत्याही पक्षाला बहुमत नसले तरी पुन्हा लिबरलचीच सत्ता येण्याची शक्यता आहे. या पक्षाला सध्यातरी 164 जागांवर आघाडी किंवा विजय मिळाला आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानेही 147 जागांपर्यंत मजल मारली आहे. विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jagmeet Singh Canada
Pahalgam Terror Attack : अखेर भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना गाठलंच; घनदाट जंगलात चकमक सुरू...

कॅनडासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला धमकावले होते. कॅनडाला अमेरिकेत आणण्याचा इशाराच त्यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेला विरोध करणारे कार्नी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याने पुन्हा एकदा कॅनडातून ट्रम्प यांच्याविरोधातील आवात बुलंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com