Pahalgam Dense Forest Operation: पहलगाम येथील पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यापासून भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत शोध मोहीम राबवली होती.
या मोहीमेला आता यश आलं असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात भारतीय लष्काराच्या प्रयत्नांना आता यश आल्याचं दिसत आहे. लष्कराने पहलगाम घटनेतील हल्लेखोरांना घेरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अखेर दहशतवाद्यांचा ठावठिकाणा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील घनदाट जंगलात हे दहशतवादी लपले होते. मात्र, भारतीय सैन्य अखेर त्यांच्याजवळ पोहोचलं असून सध्या लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानला जायच्या आधीच भारतीय लष्कराच्या तावडीत सापडल्याची बातमी समोर आली आहे. एकीकडे सैन्याने सीमेवर आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
तर भारत सरकार देखील पाक विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत केंद्र सरकार दहशतवाद्यांविरोधात काही मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.