Delhi Assembly Elections: CM आतिशी, केजरीवालानंतर आता AAPच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल

AAP MLA Dinesh Mohaniya case: निवडणूक प्रचारात दिनेश मोहनिया हे महिलांना फ्लाइंग किस करीत होते, असे तक्रारीत म्हटलं आहे. आपचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi CM
Delhi CM Sarkarnama
Published on
Updated on

Delhi Elections:दिल्ली विधानसभेची निवडणूक रंगत असताना आपच्या मुख्यमंत्री आतिशी, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गु्न्हा दाखल झाल्यानंतर आता आपच्या दोन आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज मतदान होत असतानाच आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांच्या विरोधात महिलांचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे.

निवडणूक प्रचारात दिनेश मोहनिया हे महिलांना फ्लाइंग किस करीत होते, असे तक्रारीत म्हटलं आहे. आपचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Delhi CM
Shiv Sena: थांबा! साहेब येताहेत, कुठेही जाऊ नका ; नाराजांना रोखण्यासाठी ठाकरे सेनेची धडपड

दिनेश मोहनिया यांच्या प्रचार रॅलीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. विविध कलमाच्या आधारे आमदारावर गुन्हा करण्यात आला आहे. या कारवाईवर अद्याप दिनेश मोहनिया यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आज मतदान होत असतानाच दक्षिण दिल्लीतील संगम विहार मतदारसंघातून मोहनिया हे तीन वेळा निवडून आले आहेत. आपने त्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. त्यांची लढत भाजपचे चंदन कुमार चौधरी आणि काँग्रेसचे हर्ष चौधरी यांच्यासोबत होत आहे.

मोहनिया यांच्या विरोधात आठ वर्षांपूर्वी अशाच प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

Delhi CM
Arvind Kejriwal: मतदानापूर्वीच केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल; यमुनेच्या पाण्यात विष?

दिल्ली विधानसभेसाठी 70 जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 33.31 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त मतदान उत्तर-दक्षिण दिल्ली येथे झाले आहे. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांचा हा मतदारसंघ आहे.

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, लेफनंट जनरल व्ही.के. सक्सेना, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, मुख्यमंत्री आतिशी आणि खासदार राहुल गांधी यांनी मतदान केले. खासदार प्रियांका गांधी आपली आई खासदार सोनिया आणि पति-मुलांसह मतदान केले. अरविंद केजरीवाल हे आई-वडीलांना व्हीलचेअरवर मतदानासाठी घेऊन आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com