
Pune News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला गळती लागली आहे. एकीकडे भाजपा आता दुसरीकडून शिंदेंची सेना ठाकरेंच्या पक्षांमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या नाराजांना रोखण्यात कुठेतरी स्थानिक नेते कमी पडत असल्याने आता ही गळती रोखण्यासाठी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जाते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ठाकरेंच्या सेनेत असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतंच भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर हडपसर परिसरातील काही पदाधिकारी देखील शिंदेंच्या सेनेत दाखल झाले आहेत. दोन माजी आमदार आणि आणखी काही ठाकरे सेनेचे पदाधिकारी लवकरच शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
पुण्यातील ठाकरे सेनेची ताकद आणखी कमी होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा होऊ शकते. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी या नाराजांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेत्यांची नाराजी दूर करण्यात कुठेतरी स्थानिक पदाधिकारी कमी पडत असल्याने नुकतंच काही स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत पुण्यामध्ये येण्याची विनंती केली होती.
आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये येऊन शाखाप्रमुख यांना भेटणार आहेत. त्यामुळे पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असलेल्या नाराजांना स्थानिक पदाधिकारी साहेब येणार आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत, असे सांगून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे.
पुण्यातील शहर प्रमुख आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात ठाकरे सेनेची एक बैठक झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत आढावा घेण्यात आला. पुण्यामध्ये ठाकरे सेनेच्या तब्बल 21 शाखा आहेत.
या शाखांमधील काही ठराविक शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. त्यानंतर सर्व शाखाप्रमुखांची ते संवाद साधणार आहेत. या माध्यमातून पक्ष संघटनेला नवीन ऊर्जा देऊन आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असणार आहे.
दुसरीकडे शिंदेनी देखील मिशन पुणे लॉन्च केले असून ठाकरे यांच्या सेनेतील नाराज आणि काँग्रेस मधील नाराज नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष पुण्याच्या मैदानात देखील पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.