
थोडक्यात महत्वाचे :
जीएसटी दरकपातीतून दिलासा: केंद्र सरकारने 22 सप्टेंबरपासून अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर 5% किंवा शून्य कर लावला.
मोदींचे मोठे संकेत: नोएडा येथील यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर कपात आणि जीएसटी सुधारणा प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले.
काँग्रेसवर टीका: मोदींनी काँग्रेसवर आरोप केला की 2014 पूर्वी कर खूप जास्त होते, पण आता जनतेच्या बचतीत आणि उत्पन्नात वाढ झाली आहे.
Economic Growth Rising Income and Savings in India : केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या दरांमध्ये कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे ता. 22 सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत. दैनंदिन वापरातील बहुतेक वस्तूंवर 5 टक्के किंवा शून्य कर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे संकेत दिले आहेत.
नोएडा येथील यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी पुन्हा कर कपातीचे संकेत दिले आहेत. आता आम्ही थांबणार नाही. अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. कर कमी करण्याची प्रक्रियाही सुरू राहील. जीएसटीमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रियाही सातत्यपूर्ण असेल, असे स्पष्ट विधान पंतप्रधान मोदींनी केले आहे.
काँग्रेसकडून जीएसटी कपातीवरून सरकारवर टीका केली जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 मध्ये एक लाखांच्या खरेदीवर 25 हजार कर द्यावा लागत होता. आता तो कर केवळ 5 ते 6 हजार आहे. 2014 च्या आधीचे आपले अपयश लपविण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्षांतील लोक खोटं बोलत आहेत, अशी टीकाही मोदींनी काँग्रेसवर केली.
मोदी म्हणाले, 2014 च्या आधी एवढे कर होते की व्यवसायासाठीचा खर्च आणि कुटुंबाचे बजेट कधीच संतुलित होत नव्हते. ते संतुलित करणे कठीण जायचे. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर कर कमी झाले. भारतातील लोकांच्या उत्पन्न आणि बचतीमध्ये वाढ झाली आहे. आम्ही आता इथेच थांबणार नाही, असे मोदी म्हणाले आहेत.
जगातील अनिश्चितता आणि संघर्षानंतरही भारताचा विकास आकर्षित करत आहे. कोणतेही अडथळे आमचा मार्ग बदलू शकत नाहीत, उलट आम्ही त्या स्थितीतून नवी दिशा, नव्या संधी शोधतो. त्यामुळेच भारत पुढील दशकांचा पाया मजबूत करत आहे. आत्मनिर्भर भारत हा आमचा मंत्र असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Q1: नवे जीएसटी दर कधी लागू झाले?
A: २२ सप्टेंबरपासून.
Q2: दैनंदिन वस्तूंवर किती कर आहे?
A: बहुतांश वस्तूंवर ५% किंवा शून्य.
Q3: पंतप्रधान मोदींनी काय संकेत दिले?
A: कर कपात आणि जीएसटी सुधारणा सुरू राहतील.
Q4: काँग्रेसची काय भूमिका आहे?
A: काँग्रेसने दरकपातीवरून सरकारवर टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.