Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल हेच 'मुख्य सूत्रधार'; पैशांच्या मार्गाचा चिठ्ठा सापडलाचा 'सीबीआय'चा दावा

Arvind Kejriwal is the main mastermind in the liquor scam : दिल्लीतील दारू घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सीबीआयने अहवाल दाखल केला. यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिल्लीतील दारू घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सीबीआयने अहवाल दाखल केला. ईडीनंतर सीबीआयने दाखल केलेल्या अहवालामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्यात.

दारू घोटाळा प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवाल आहे, असे या अहवालात म्हटले आहे. आरोपपत्र एका महिन्यात दाखल केले जाईल, असेही सीबीआयने दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टासमोर सांगितले आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या अहवालामुळे आपचे (AAP) नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामीन देखील मिळणे अवघड होऊन बसले आहे. उत्पादन शुल्क धोरण दारू घोटाळ्याशी निगडीत असून या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी अरविंद केजरीवाल आहेत. सीबीआयने आपल्या अहवालात घोटाळ्याचे सूत्रधार अरविंद केजरीवाल यांना म्हटले आहे. संपूर्ण आरोपपत्र दाखल झाल्यावर अरविंद केजरीवाल यांच्याशी निगडीत काय आणखी आरोप ठेवले आहेत, याचा अधिक खुलासा होणार आहे. या अहवालामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी मात्र वाढल्यात.

Arvind Kejriwal
Hemant Soren News : हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा ; 'ED'ची याचिका फेटाळली!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुन्ह्यात अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला. पुढे सीबीआयने मद्य धोरण घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर ठेवला. या घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना सीबीआयेने 26 जूनला अटक केली.

Arvind Kejriwal
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा; नितीशबाबू, लालूंना ‘दे धक्का’

या घोटाळ्याशी विविध दावे सीबीआयने न्यायालयात (Court) केले आहे. लाच घेतल्यानेतर दिल्लीच्या अबकारी धोरणाचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्यात आल्याचा प्रमुख आरोप सीबीआयने न्यायालयात केला. साऊथ ग्रुपच्या सांगण्यावरूनच संपूर्ण पॉलिसीत बदल होत होता. या प्रकरणातील पैशांचा संपूर्ण मार्गाचा छडा लावण्यात यश आले असल्याचेही सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. आपचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील याच प्रकरणात 16 महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

'आप'चा गंभीर आरोप

सीबीआयने न्यायालयात अहवाल दाखल करताच आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. अरविंद केजरीवार यांच्याविरोधात षडयंत्र रचले गेले आहे. त्यांना बळी केले जात आहे. केजरीवाल यांना तुरुंगात राजकीय कैद्यासारखी वागणू जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला. तुरुंगातही त्यांची साखरेची पातळी सातत्याने खाली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com