Natural disasters in India : नैसर्गिक संकटांची जबाबदारी ठरली; केंद्राकडून 'आपत्तींचं' वर्गीकरण; अमित शहांनी 9 मंत्रालयांना लावलं कामाला

Natural disasters : भारतामध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने ९ मंत्रालयांना जबाबदारी दिली असून, विविध आपत्तींसाठी स्वतंत्र मंत्रालये नियुक्त केली आहेत.
Central government assigns 9 ministries the responsibility of managing natural disasters in India.
Central government assigns 9 ministries the responsibility of managing natural disasters in India.Sarkarnama
Published on
Updated on

Natural disasters : नैसर्गिक आपत्ती आणि संकट ही नित्याची बाब झाली आहे. भुकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, महापूर, भुस्खलन अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतो. भारतात अशा प्रकारच्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे आजपर्यंत लाखो नागरिक बाधित झाले आहेत. याच नैसर्गिक आपत्तीला भविष्यात तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आता भविष्यात अशा आपत्ती आल्यास काय करायचे? नागरिकांना कसे वाचवायचे यासाठी केंद्र सरकारने 9 मंत्रालयांकडे जबाबदारी सोपवली आहे. या आपत्तींवर बारकाईने लक्ष ठेवणे, त्याची पूर्वसूचना देणे, त्यावर उपाय करणे, संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळणे अशी जबाबदारी या मंत्रालयांकडे असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच याबाबतची अधिसूचना काढली आहे.

भूस्खलन आणि तेलगळतीसारख्या समस्यांचा सामना आता संरक्षण मंत्रालय करणार आहे. धुके आणि थंडीची लाट, वादळे, भूकंप, उष्णतेच्या लाटा, विजा, त्सुनामी आणि अतिवृष्टी यांचा सामना करण्याची जबाबदारी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे दिली आहे. दुष्काळ, कीटकांचा हल्ला आदींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे सोपविण्यात आली आहे.

Central government assigns 9 ministries the responsibility of managing natural disasters in India.
Narendra Modi Healthy Habits : 75व्या वर्षीही ऊर्जा तशीच! PM मोदींच्या हेल्दी लाइफस्टाइलचं गुपित काय?

पूर, हिमतळी फुटून अचानक येणारा पूर याबाबत जलशक्ती मंत्रालय काम करणार आहे. शहरी भागांतील पुरांबाबत पूर्वसूचना देण्याचे काम प्रामुख्याने गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडे असणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे जैविक संकटाकडे लक्ष देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

Central government assigns 9 ministries the responsibility of managing natural disasters in India.
Mallikarjun Kharge on PM Modi : पंतप्रधान मोदी 2.5 लाख कोटींच्या बचतीवर बोलले, खर्गेंनी 55 लाख कोटींच्या वसुलीचा आकडाच दाखवला...

जंगलातील वणवे, औद्योगिक आणि रसायनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतील स्फोट आणि आगी आदींची जबाबदारी हे पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाकडे सोपविण्यात आली आहे. खणिकर्म मंत्रालय हे भूस्खलनाच्या समस्येचा सामना करेल तसेच अणुऊर्जा विभाग हा आण्विक संकट आणि किरणोत्सारावेळी मैदानात उतरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com