Nawab Malik : अनिल देशमुखांपाठोपाठ मलिकांना मिळणार का जामीन? आज होणार फैसला

Anil Deeshmukh : जामीन मिळाला असला तरीही अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम पुढील 10 दिवस वाढला आहे.
Anil Deshmukh |Nawab Malik
Anil Deshmukh |Nawab MalikSarkarnama

Nawab Malik : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार नवाब मलिक(Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे. देशमुंखाप्रमाणेच मलिक यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की तुरुंगातील मुक्काम पुन्हा वाढणार याचा फैसला आजच्या सुनावणीत होणार आहे.

कथित गैरव्यवहार प्रकरणात जामीन फेटाळण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मलिकांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले. तसेच ही सुनावणी तातडीने घेण्याची मागणी केली. त्यांच्या अपिलाची गंभीर दखल घेत न्या. मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक यांनाही जामीन मिळतो का ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. प्रकृतीचे कारण देत मलिकांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 

Anil Deshmukh |Nawab Malik
Pralhad Modi : आधी म्हणाले, मोदी देश कल्याणाचे काम करत आहेत ; मग दिला सरकार घालवण्याचा इशारा..

अनिल देखमुखांना जामीन, पण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भ्रष्टाचार आणि वसुलीच्या आरोप करण्यात आल्यानंतर सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये सोमवारी (दि.12) जामीन मंजूर झाला.

मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय(CBI) ने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं. त्यासाठी जामिनाच्या अर्जावर 10 दिवसांची स्थगिती मिळावी अशी मागणी देखील सीबीआयने केली. यावर उच्च न्यायालयाने सीबाआयचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांच्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे जामीन मिळाला असला तरीही अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम पुढील 10 दिवस वाढला आहे.

Anil Deshmukh |Nawab Malik
Tukaram Mundhe News : मुंडेंच्या बदलीसाठी मंत्री सावंतांचीच फिल्डिंग; पत्रच आले समोर!

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय?

गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कटरचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या संबंधित महिलेने 1999 या वर्षी मध्ये सलीम पटेल या व्यक्तिच्या नावे पॉवर ऑफ एटर्नी तयार केली होती. यानंतर पटेल याने पॉवर ऑफ एटर्नी गैरवापर करत हसीना पारकरच्या सांगण्याप्रमाणे गोवावाला कंपाउंडची जमीन नवाब मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विक्री केल्याचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com