New Delhi News : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman News) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून बहुतेक प्रमुख नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जात असताना सीतारमण यांनी का माघार घेतली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना याचे उत्तर त्यांनीच दिले आहे. निवडणूक लढण्यासाठी लागणारे तेवढे पैसे आपल्याकडे नसल्याने नकार दिल्याचे सीतारमण यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थमंत्र्यांची संपत्ती नेमकी किती आहे, याबाबत उत्सुकता आहे.
आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडूमध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election News) जिंकण्यासाठी जे मापदंड आहेत, ते मी पूर्ण करू शकत नाही. निवडणूक लढण्यासाठी आवश्यक पैसे माझ्याकडे नाहीत. तसेच कोणतातरी खास समाज किंवा धर्माचे समीकरण असते. या मापदंडात मी फिट होत नाही. त्यामुळे मी निवडणूक लढण्यास नकार दिल्याचे राज्यसभेच्या खासदार असलेल्या सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
किती आहे संपत्ती?
सीतारमण यांनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ‘त्यांच्याकडे दोन कोटींहून अधिक संपत्ती होती, तर 30 लाखांहून अधिक देणीही आहेत.’ पीएमओच्या वेबसाइटनुसार, वर्ष 2022 मध्ये सीतारमण यांच्याकडे केवळ 7 हजार 350 रुपये रोख रक्कम आणि विविध बँक खात्यांमध्ये झिपॉझिट करण्यात आलेली रक्कम 35 लाख 52 हजार 666 एवढी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकही कार नाही
अर्थमंत्र्यांनी पीपीएफमध्ये 1 लाख 59 हजार 763 रुपये गुंतवले आहेत, तर म्युचुअल फंडमध्येही त्यांनी 5 लाख 80 हजार 424 रुपये गुंजवले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी नाही. एलआयसी किंवा अन्य कोणताही विमा नाही. विशेष म्हणजे आपल्याकडे कोणताही कार नसल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे. त्यांच्या नावावर एक बजाज चेतक स्कूटर आहे. त्याची किंमत 28 हजार 200 रुपये देण्यात आली आहे.
सीतारमण यांच्याकडे 2022 मध्ये 18 लाख 46 हजार 987 रुपयांचे दागिने होते. त्यापैकी 315 ग्रॅम सोने आहे. सध्याच्या स्थितीत या सोन्याची किंमत जवळपास 20 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे तेलंगणामध्ये एक आलिशान घर असून, त्यांची किंमत तब्बल 1 कोटी 70 लाख 51 हजार 400 रुपये एवढी आहे. त्यासोबतच हयातनगरमध्ये जमीन असून, त्याची किंमत 17 लाख 8 हजार 800 रुपये आहे.
सीतारमण यांच्या नावावर तीन कर्ज
सीतारमण यांच्या नावावर 19 वर्षांचे एक घरकर्ज असून, एक वर्षाचा ओव्हरड्राफ्ट आणि 10 वर्षांचे तारण कर्ज आहे. ही रक्कम अनुक्रमे 5 लाख 44 हजार 822, 2 लाख 53 हजार 55 आणि 18 लाख 93 हजार 989 रुपये एवढी आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला कमाल 95 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. आयोगाला सर्व खर्चाची माहितीही द्यावी लागते. आयोगाकडून प्रत्येक वस्तूची किंमतही निश्चित केली जाते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.