International Political News : चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँग जूनमध्ये बेपत्ता झाले होते. त्यांचा आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आत्महत्या केली असेल किंवा त्यांचा छळामुळे मृत्यू झाला असेल, असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेत चीनचे दूत म्हणून कार्यरत असताना त्यांची विवाहबाह्य संबंधावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
पॉलिटिकोच्या अहवालानुसार, चीनमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी किन यांचा जुलैअखेरीस चीनमधील एका रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगितले होते. संबंधित रुग्णालयात देशातील मोठ्या नेत्यांवर उपचार केले जातात, तर वॉल स्ट्रीट जर्नलच्या आधीच्या अहवालात, किन युनायटेड स्टेट्समध्ये राजदूत असताना विवाहबाह्य संबंधात गुंतल्याचे सांगण्यात आले होते.
चीनमधील प्रचार यंत्रणेच्या माहितीनुसार, अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून कार्यरत असताना किन यांची फू झियाओटियन नावाच्या एका रिपोर्टरशी जवळीक वाढली होती. त्यांचे एक मूल होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांची जुलैमध्ये पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने अंतर्गत केलेल्या तपासणीत, किन अमेरिकेत त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात या प्रकरणात गुंतल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणातून किनने चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली होती का, या दृष्टीनेही तपास करण्यात आला होता.
जुलैमध्ये किन यांना हटवल्यानंतर, त्यांच्या जागी अनुभवी, मुत्सद्दी वांग यी यांची परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, चीनचे परराष्ट्र आणि संरक्षणमंत्री, किन गँग आणि ली शांगफू यांची हकालपट्टी केल्याची प्रकरणे जगभरात चर्चेचा विषय बनलेली आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.