Kalyan Lok Sabha BJP : 'कल्याण'ची मोहीम भाजप फत्ते करणार ? 'या' महिला पदाधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी

BJP Mission 45 : भाजपच्या मिशन 45 मध्ये महिलांचा मोलाचा सहभाग असणार
Kalyan BJP
Kalyan BJPSarkarnama

Kalyan Political News : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत महिलांनी भाजपला मोठा कौल दिला. दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने मिशन 45 राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत महिला पदाधिकाऱ्यांना बूस्ट देण्याच्या विचारात भाजप वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण लोकसभा महिला प्रमुख पदाची जबाबदारी मृणाल पेंडसेंवर सोपवली आहे. भाजपची तयारी पाहून येथील शिंदे गटात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोकसभा राबविण्यात येत असून, मिशन 45 अधिक राबविण्यात येत आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांमधील निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले. हीच बाब लक्षात घेऊन महिला पदाधिकाऱ्यांना बूस्ट देण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Kalyan BJP
BJP Politics : डरकाळीच नव्हे, हल्लाही करतो; हे दाखवून देण्याची 'सिंहा'ला संधी; माढा लोकसभेसाठी भाजपचं ठरलं...

तीन राज्यांतील महिला मतदारांचा कौल पाहता भाजपने स्थानिक पातळीवर डावललेल्या महिला पदाधिकाऱ्यांना थेट प्रदेश पातळीवरील संघटन बांधणीची जबाबदारी सोपवण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील भाजपच्या माजी महिला अध्यक्षा मृणाल पंडसे यांच्या खांद्यावर पक्षाने एक नाही तर थेट चार-चार जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्यातही कल्याण लोकसभा महिला प्रमुख पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे दिल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. या नियुक्तीमुळे कल्याणच्या मोहिमेवर ठाण्याची स्वारी पाठवल्याची चर्चा आहे.

भाजप (BJP)ने पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पक्षबांधणीसाठी बूथपासून सुरुवात केली आहे, तर जिल्हा पातळीवरीलही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी संजय वाघुले यांची नियुक्ती झाल्यावर महिला अध्यक्षही बदलण्यात आले.

Kalyan BJP
Farmers Protest : पीकविम्याची रक्कम तिजोरीत ठेवून बैलगाडीद्वारे आणत शेतकऱ्यांचं हटके आंदोलन!

मृणाल पेंडसे यांच्या जागी स्नेहा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपच्या महिला गटात काहीसा नाराजीचा सूरही उमटला होता, परंतु वरिष्ठांनीही ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महिला पदाधिकारी पक्षासाठी किती महत्त्वाच्या आहेत, याची प्रचितीही पक्षाला आलेली आहे. यातूनच नाराज झालेल्या पेंडसेंची भाजपने थेट महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पेंडसेंनी शहर अध्यक्षपदाचा कार्यकाळ गाजवला होता. सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आंदोलन, शहरातील विविध प्रश्नांबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, यामुळे पेंडसे या नेहमीच चर्चेत राहिल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना थेट वरिष्ठ पातळीवर नेऊन ठेवले आहे.

आता पेंडसेंच्या खांद्यावर एक नाही तर चार जबाबदाऱ्या आहेत. महिला मोर्चा सचिव, मन की बात महाराष्ट्र महिला संयोजक आणि कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) महिला प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी टाकण्यात आली आहे. दरम्यान, पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांची निर्णायक भूमिका लक्षात घेता, भाजपने आपल्या पक्षातील महिलांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काळात आता कल्याण लोकसभेसाठी पेंडसे यांना महिला मतदारांना आकर्षित करावे लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Kalyan BJP
PM Narendra Modi : " मला मोदीजी, आदरणीय मोदीजी म्हणू नका,त्यामुळे..." ; पंतप्रधानांचा आपुलकीचा सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com