Devendra Fadnavis:"...म्हणून नवाब मलिकांना 'महायुती'त घेता येणार नाही!"; फडणवीसांचं अजितदादांना पत्र

Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik : "सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे..."; देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र, चर्चांना उधाण
Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik
Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी आज हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मलिक कुठल्या गटात जाणार, तसेच सभागृहात आल्यानंतर मलिक कोणत्या बाकावर बसणार, याबद्दल कमालीची उत्सुकता होती. अखेर अधिवेशनात मलिक सत्ताधाऱ्यांच्या मागील बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं. मात्र, आता यावरूनच राजकारण तापलं असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलं आहे.

नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते आरोप पाहता त्यांना 'महायुती'मध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. फडणवीसांनी हे पत्र एक्सवरून (ट्विटर) शेअर देखील केलं आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार गट काय स्पष्टीकरण देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवाब मलिक यांनी अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची भेट घेतली होती. सभागृहाच्या परिसरात मलिक आणि अनिल देशमुख यांचीही गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर मात्र मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर शेवटी बसले. त्यामुळे मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. आता यावरूनच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पत्र लिहित मलिकांना 'महायुती'त घेण्यासाठी नकार दिला आहे.

फडणवीसांनी पत्रात काय म्हटलं ?

"माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत. ते पाहता, त्यांना 'महायुती'मध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे", असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik
Nagpur Winter Session : 'राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता; कोणत्याही गटाचा नाही'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com