Bibek Debroy : मोदींचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन; पुण्याशी होते खास नाते

Modi Economic Advisor Bibek Debroy Passes Away: बिबेक देबरॉय काही दिवस पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच कुलपती होते.
Bibek Debroy
Bibek DebroySarkarnama
Published on
Updated on

New Delhi : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे शुक्रवारी निधन झाले. देशाच्या आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 69 वर्षे होते.

देबरॉय यांनी पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार तसेच अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर मोदींनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. मोदींनी म्हटले आहे की, अर्थकारण, संस्कृती, अध्यात्म अशा विविधांगी विषयांचा गाढा अभ्यास असलेले देबरॉय हे एक ज्ञानी व्यक्तिमत्व होते.

Bibek Debroy
Sikkim Assembly Election : देशात आहे, एकही विरोधी आमदार नसलेली विधानसभा; या राज्यात तीनदा असं घडलं!

देशातील सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून ध्येयधोरणे निश्चित करण्यात त्यांचा हातखंडा होता. देशातील ऐतिहासिक दस्तावेज तरुणांपर्यंत पोहचवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्ञानकेंद्रित परंपरेतील त्यांचे योगदान मोलाचे होते, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

पुण्याशी खास नाते

देबरॉय हे पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेची माजी कुलपती होते. त्यांची यावर्षी जुलै महिन्यातच या पदावर नियुक्ती झाली होती. पण कुलगुरूंच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता.

Bibek Debroy
Top 10 News : 'या' तारखेनंतर CM शिंदे राजकारणात नसतील...; हेमंत सोरेन यांचं वय 5 वर्षांत 7 वर्षे वाढले! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

विशेष म्हणजे, देबरॉय हे 1983-87 या कालावधीत गोखले संस्थेत कार्यरत होते. त्यामुळे याच संस्थेचे कुलपती होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्याचप्रमाणे ते पुण्यातील डेक्कन कॉलेजचे कुलपतीही होते. यांसह अनेक संस्थांमध्ये त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना केंद्र सरकारकडून 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com