Sikkim Assembly Election : देशात आहे, एकही विरोधी आमदार नसलेली विधानसभा; या राज्यात तीनदा असं घडलं!

Sikkim Bypolls Assembly Election: सिक्कीम विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे दोन्ही उमेदवारी बिनविरोध निवडून आले आहेत.
Assembly Bypolls
Assembly BypollsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : विधानसभेत विरोधी बाकांवर एकही आमदार नसलेले राज्य पाहिले आहे का? असं घडलंय, तेही एकदा नव्हे तीनदा. देशातील एक छोटेसे राज्य असलेल्या सिक्कीममध्ये असा इतिहास यंदाही घडला आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) या पक्षाने हे करून दाखवले आहे.

सिक्कीममध्ये दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार सत्ताधारी ‘एसकेएम’, सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF) आणि इतर काही पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीमध्ये एमकेएम आणि एसडीएफ वगळता इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर एसडीएफच्या उमेदवारांनी दोन्ही मतदारसंघातून अर्ज मागे घेतले.

Assembly Bypolls
Rajasthan Bypolls : भाजप-काँग्रेसला छोट्या पक्षांसह अपक्षांची कडवी झुंज; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

पोटनिवडणुकीसाठी केवळ एसकेएमच्या उमेदवारांचे अर्ज उरल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीनंतर सिक्कीम विधानसभेत एकही विरोधी आमदार उरला नाही. विधानसभेच्या 32 जागा असून आता सर्वच्या सर्व 32 आमदार एसकेएमचे असतील. पक्षाचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या राजकीय खेळीमुळे विधानसभेत विरोध करायला विरोधी बाकांवर एकही आमदार नसेल. विशेष म्हणजे तमांग यांचा पक्ष सध्या भाजपप्रणित एनडीएमध्ये आहे.

राज्यात यापूर्वी दोनदा अशा घटना घडल्या आहेत. पहिल्यांदा 1989 मध्ये सिक्कीम संग्राम परिषदेने हा चमत्कार घडवून आणला होता. विधानसभेत या पक्षाचे सर्व 32 आमदार निवडून आले होते. त्यानंतर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटनेही आपला करिष्मा दाखवत सर्व जागा जिंकल्या होत्या. यावेळी तिसऱ्यांदा असे घडले असून पक्षही वेगळा आहे.

Assembly Bypolls
Top 10 News : 'या' तारखेनंतर CM शिंदे राजकारणात नसतील...; हेमंत सोरेन यांचं वय 5 वर्षांत 7 वर्षे वाढले! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

विरोधी आमदारही सत्तेत

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एसकेएम पक्षाने 32 पैकी 31 जागा जिंकत राज्यात सत्ता काबीज केली होती. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एसडीएफला केवळ एक जागा मिळाली होती. त्यानंतर काही काही दिवसांतच या आमदारानेही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.

पण त्याआधी निवडणुकीत मुख्यमंत्री तमांग दोन मतदारसंघातून निवड आल्याने त्यांनी एका मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या पत्नीही या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. पण त्यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात तमांग यांच्या पक्षाचे दोन आमदार बिनविरोध निवडून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com