Chandigarh Mayor election : निवृत्त CJI चंद्रचूड संतापले होते; पुन्हा गाजू लागली चंदीगढची महापौर निवडणूक, नगरसेविकेच्या भावजयीला अटक

Municipal election controversy : काही दिवसांपूर्वीच आपमधील दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपकडील नगरसेवकांची संख्या १८ वर पोहचली आहे.
Chandigarh Mayor election
Chandigarh Mayor electionSarkarnama
Published on
Updated on

Municipal election controversy : चंदीगढ महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दोन वर्षांपूर्वी धक्कादायक प्रकार घडला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतपत्रिकेत खाडाखोड करत नगरसेवकांची मतपत्रिका बाद केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावेळी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आल्यानंतर ते चांगलेच संतापले होते.

निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याच कोर्टात पुन्हा मतपत्रिकांची मोजणी झाली अन् आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. मागील वर्षीही ही निवडणूक फोडाफोडीच्या राजकारणाने गाजली होती. यावर्षी ही निवडणूक २९ जानेवारीला असून त्याआधीच राजकीय कुरघोड्यांना वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वीच आपमधील दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपकडील नगरसेवकांची संख्या १८ वर पोहचली आहे. चंदीगढ महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ३५ नगरसेवक आणि एक स्थानिक खासदार मतदान करतात. महापौरपदासाठी १९ मतांची गरज आहे. विरोधी पक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसची गोळीबेरीजही भाजपएवढीच म्हणजे १८ आहे.

Chandigarh Mayor election
IAS Shrikant Khandekar : आप्पा म्हणत होता, मी आत्महत्या करतो मंत्रालयासमोर जाऊन..! शिंदेंच्या IAS जावयानं लिहिलेलं मन हेलावून टाकणारं ‘ते’ वास्तव...

सत्ताधारी आणि विरोधकांकडे सारखीच मते असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार, हे स्पष्टच आहे. मात्र, त्याआधीच नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आपच्या नगरसेविका सुमन देवी यांच्या भावजयीला पंजाब पोलिसांनी शनिवारी अटक केली. या घडामोडींमुळे राजकीय वादळ उठले आहे. भाजपने राजकीय सुडापोटी ही अटक केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या कोमल शर्मा यांच्यावर सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पंजाब पाणीपुरवठा मंडळाचे अध्यक्ष सनी सिंह अहलूवालिया यांच्या मोहाली येथील कार्यालयात लेखनिक म्हणून काम करत होत्या. अहलूवालिया हे चंदीगढ आपचे सह-प्रभारी आहेत. कोमल शर्मा यांनी कार्यालयात गैरहजर असताना सरकारची फसवणूक करून वेतन लाटल्याचा आरोप आहे. त्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Chandigarh Mayor election
Congress Politics : एकही आमदार नाही, थेट खासदाराचा पक्षप्रवेश अन् लगेच पदाचा राजीनामाही; काँग्रेस तरीही भलतंच खूश, असं आहे 'डबल डिजिट'चं गणित...

शर्मा यांच्या अटकेमुळे चंदीगढमदील राजकारण चांगलेच तापले आहे. या अटकेविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून सत्ताधारी आप सरकारविरोधात थेट कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. नगरसेवकांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक यंदाही प्रचंड गाजणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.      

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com