

MP joins Congress : देशातील काही महत्वाच्या राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. देशात केवळ तीन राज्यांत स्वबळावर सत्तेत असलेल्या काँग्रेससमोर निवडणुकांमध्ये आपली कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यातही प्रामुख्याने एकही आमदार नसलेल्या पश्चिम बंगालमध्ये.
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका महिला खासदाराने काँग्रेसचा हात हातात घेतला. त्यानंतर दोन दिवसांत खासदारकीचा राजीनामाही दिला. या एका प्रवेशाने काँग्रेसला आगामी निवडणुकीत किमान आमदारांचा दुहेरी आकडा गाठता येईल, असे वाटू लागले आहे. २०२१ च्या निवडणुकीत भोपळाही न फोडू शकलेली काँग्रेस या पक्षप्रवेशाने एवढी खूश का आहे? त्याचे कारणही तसंच आहे.
मौसम नूर या तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांनी मागील आठवड्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेच्या सभापतींनी तो राजीनामा मंजूरही केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांची खरंतर घरवापसी झाली आहे. ही घडामोड काँग्रेससाठी महत्वाची मानली जात आहे.
मौसम नूर यांच्या आई रूबी नूर बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुजापूर मतदारसंघाच्या चारेवळा काँग्रेसच्या आमदार होत्या. मौसम यांचे काका अबू बरकत अऊर गनी खान चौधरी हे काँग्रेसचे मोठे नेते होते. ते मालदाचे आठवेळा खासदार होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते. आता मौसम यांच्या पक्षातील परतीमुळे मालदासह मुर्शिदाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा पक्षाची ताकद वाढणार आहे.
मालदा दक्षिण मतदारसंघात मौसम यांची तुलत बहीण ईशा खान चौधरी खासदार आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद हे मुस्लिम बहुल जिल्हे असून यापूर्वी तिथे काँग्रेसचा दबदबा असायचा. पण २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट झाली. २०१६ च्या विधानसभेत पक्षाला मालदातील १३ पैकी आठ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसला मालदा जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ गमवावे लागले होते. २०२४ मध्ये ईशा यांनी एक जागा पुन्हा मिळविली. इथूनच काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या अन् मौसम यांच्या परतीने त्याला धुमारे फुटले आहेत.
मौसम नूर यांनाही राजकारणाचा मोठा अनुभव आहे. २००८ पासून त्या राजकारणात आहेत. एकदा आमदार आणि दोनदा खासदार होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्या तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या होत्या. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होत्या. त्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यातच मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाचा चेहरा असतील. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये नूर यांच्यामुळे पक्षाला मोठा फायदा होईल, अशी आशा काँग्रेसला आहे. या दोन जिल्ह्यातच २०१६ च्या निवडणुकीप्रमाणेच पक्षाला यश मिळेल, अशी पक्षाला अपेक्षा आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यातच आमदारांचा आकडा डबल डिजिट होईल, असेही वाटू लागले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचं हे गणित प्रत्यक्षात किती खरे ठरणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.