Mayor Election : महापौर निवडणुकीत ट्विस्ट, अधिकारीच पडले आजारी; 'ऑपरेशन लोटस फेल'...

Congress-AAP Vs BJP : आप आणि काँग्रेसची आघाडी झालेली पहिलीच निवडणूक...
Congress, AAP, BJP
Congress, AAP, BJPSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh News : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत आप आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे त्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आघाडी झाली आहे. इंडिया आघाडी म्हणून सामोरे जात असलेल्या पहिल्याच निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. आज होणारी ही निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे.

निवडणूक (Election) अधिकारीच आजारी पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण भाजपचे (BJP) ऑपरेशन लोटस (Operation Lotus) फेल झाल्याने हे निवडणूक पुढे ढकलण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप आप (AAP) व काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी केला आहे.

Congress, AAP, BJP
Bilkis Bano Case : आजारी आई-वडील, शेतकाम अन् मुलाच्या लग्नासाठी गुन्हेगारांना हवाय वेळ; सुप्रीम कोर्टात धाव

चंदीगड महापालिकेच्या सचिव इशा कंबोज यांनी निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आदेश काढला आहे. या निवडणुकीत आप-काँग्रेस विरूध्द भाजप अशी लढत होणार आहे. इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठेची मानली जात आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाची असल्याचे याच पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातच निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आता दोन्ही पक्षांनी भाजपवर निशाणा साधला आहे. चंदीगड काँग्रेसचे प्रमुख हरमोहिंदर सिंग लकी म्हणाले, ऑपरेशन लोटस फेल झाल्याने भाजपला पराभव दिसू लागला असेल. आम्ही सर्वजण इथे मतदानासाठी आलो आहोत. पण भाजप मानसिकदष्ट्या हरली आहे. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने हा भाजप पराभव स्वीकारू शकत नाही, हेच दिसते.

काँग्रेसचे नेते पवन बन्सल यांनीही भाजपवर टीका केली. ते म्हणाले, नगरसेवकांना महापालिका कार्यालयात प्रवेश दिला जात नाही. निवडणूक अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले जात आहे. भाजप निवडणूक होऊ देऊ इच्छित नाही. आम्ही हायकोर्टात जाऊ. ते लोकशाहीविरोधी काम करत आहेत, असे बन्सल यांनी सांगितले.

Congress, AAP, BJP
Supreme Court : गुंड मोहोळचे कौतुक करणाऱ्या टी. राजांचे कार्यक्रम रोखण्यास कोर्टाचा नकार; जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com