Modi on Pakistan Relations :''मी शांततेसाठी सर्व प्रयत्न केले, कदाचित एक दिवस...'' ; मोदींचं पाकिस्तानबाबत मोठं विधान!

PM Modi-Lex Fridman Podcast: लेक्स फ्रिडमन सोबतच्या प्रदीर्घ पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वांच्या मुद्य्यांवर खुलेपणाने आपलं मत व्यक्त केलं आहे.
PM Modi interview Lex Fridman podcast
PM Modi interview Lex Fridman podcastSarkarnama
Published on
Updated on

PM Modi on India Pakistan Relations: पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्यासोबत चालेल्या प्रदीर्घ चर्चेत भारत अन् पाकिस्तानमधी संबंधावरही खुलेपणाने भाष्य केलं.

मोदींनी पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांबाबत सांगितले. यादरम्यान मोदींनी सांगितले की, मी पाकिस्तानसोबत शांततेसाठी लाहोरलाही गेलो, परंतु परिणाम नकारात्मक मिळाले. यावेळी मोदींना दहशतवाद्याच्या मुद्य्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला.

लेक्स फ्रिडमन यांनी भारत-पाकिस्तान मुदय्यावर पंतप्रधान मोदींना (PM Modi) म्हटले की, एक आणि अतिशय ऐतिहासिक व कठीण गुंतागुंतीचा संघर्ष निर्माण झालेला आहे, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष. हा जगातील सर्वात भयानक संघर्षापैकी एक आहे. दोन्ही देश अणवस्त्रसंपन्न आहेत. तुम्ही भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री आणि शांततेसाठी कोणत मार्ग बघता आहात.

PM Modi interview Lex Fridman podcast
PM Modi on Gujarat riots : पंतप्रधान मोदींचं लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये गुजरात दंगलीबाबत मोठं विधान, म्हणाले...

लेक्स यांनी विचारलेल्या या प्रश्नावर बोलातना मोदींनी म्हटले की, इतिहासातील गोष्टी जगातील अनेक लोकांना माहिती नाही. 1947 आधी स्वातंत्र्याची लढाई सर्वजण खांद्यालाखांदा लावून लढत होते. त्यावेळी धोरणकर्त्यांनी फाळणी स्वीकारली.

मुस्लिमांना पाकिस्तानच्या रूपात देश दिला गेला. भारताच्या लोकांनी काळजावर दगड ठेवून अतिशय दु:खी अंतकरणाने हे मान्य केलं. परंतु त्याचवेळी प्रचंड रक्तपात झाला. पाकिस्तानातून मृतदेह भरून रेल्वे येवू लागल्या, ते अतिशय भयावह दृश्य होतं.

मोदी म्हणाले की, आपलं मिळवल्यानंतर त्यांना वाटायला हवं की, आपल्याला आपलं मिळालं, भारताचे आभार मानूयात. परंतु त्यांनी भारतासोबत कायमच संघर्षाचा मार्ग निवडला. आता पॉक्सी वॉर सुरू आहे. ही कोणतीही विचारधारा नाही. हे केवळ आमच्यासोबतच आहे. जगभरात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी कुठं ना कुठं त्याचा संबंध पाकिस्तानशी संबंध दिसतो.

9/11चा दहशतवादी हल्ला किती मोठी घटना होती. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. जगाला कळले आहे की, दहशतवादी मानसिकता भारतसाठीच नव्हे तर जगभरासाठी अडचणीचे केंद्र बनली आहे.

PM Modi interview Lex Fridman podcast
Pakistan Terrorist Attack : 'बीएलए'चा पुन्हा पाकिस्तानवर हल्ला! लष्कराच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवलं, 90 जवान ठार

पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, आम्ही सातत्याने त्यांना सांगत आलो की, या मार्गाने कुणाचेही भले होणार नाही. तुम्ही दहशतवादाचा रस्ता सोडा. राज्य पुरस्कृत दहशतवादावर बंद झाला पाहिजे. शांततेच्या प्रय़त्नासाठी मी स्वत: लाहोरला गेलो होतो. मी पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या शपथविधीसाठी मी विशेषरित्या पाकिस्तानला(Pakistan) आमंत्रित केलं होतं.

जेणेकरून एक चांगली सुरुवात व्हावी, परंतु प्रत्येक चांगल्या प्रयतनांचे परिणाम नकारात्मक निघाले. मोदींनी म्हटले की, अपेक्षा करतो की त्यांना सद्बुद्धी लाभेल आणि सुख-शांतीच्या मार्गाने जातील. तेथील जनताही दु:खी झाली आहे, असं मी मानतो. अशाप्रकारच्या रक्तपाताने, हिंसाचाराच्या घटनांमुळे पाकिस्तानातील लोकही त्रस्त आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com