Political Parties in India : देशात पहिल्यांदाच 1 कोटी कार्यकर्त्यांना विम्याचे कवच; ‘या’ राजकीय पक्षाने घडवला इतिहास

Telgu Desam Party Nara Lokesh Insurance to party Workers : टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनी कार्यकर्त्यांसाठीच्या विमा योजनेची घोषणा केली.
Insurance for Workers
Insurance for WorkersSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता आल्यानंतर नागरिकांना खूष करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जातात. पण ज्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे सत्ता मिळाली, त्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या कार्यकर्त्यांना विम्याचे सुरक्षा कवच मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काही दिवसांतच आंध्र प्रदेशमध्ये सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली. अत्यंत कमी कालावधी या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि एक कोटींहून अधिक नोंदणी झाली. प्रत्येक सदस्याकडून त्यासाठी 100 रुपये शुल्क घेण्यात आले. त्यानंतर या कार्यकर्त्यांसाठी पक्षाने विमा योजना सुरू केली आहे.

Insurance for Workers
BJP Politics : माजी खासदार, माजी आमदार की नवा चेहरा? कोण होणार भाजपचा पुढील प्रदेशाध्यक्ष?

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांनी गुरूवारी विमा कंपन्यांसोबत करार केला. या माध्यमातून सर्व एक कोटी कार्यकर्त्यांचा विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे टीडीपीने देशाच्या राजकारणात इतिहास घडवला आहे. कायकर्त्यांना विम्याचे संरक्षण देणारी टीडीपी हा देशातील एकमेव पक्ष ठरला आहे.

टीडीपीने विम्याच्या पहिल्या हप्त्यापोटी विमा कंपनीला 42 कोटी रुपये दिले आहेत. ता. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 असा वर्षभराचा हा विमा असेल. पुढील वर्षीही एवढी रक्कम कंपन्यांना दिली जाईल. या करारानुसार सर्व कार्यकर्त्यांना पाच लाखांचे अपघाती विमा कवच मिळणार आहे.

Insurance for Workers
Delhi Assembly Election : दिल्लीच्या राजकारणात दाऊदची एन्ट्री; मुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली...

दरम्यान, नारा लोकेश यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र सेल तयार करत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यासाठी आतापर्यंत पक्षाने सुमारे 138 कोटी रुपये खर्च केले आहेत. स्वतंत्र विधी सेल सुरू करण्यात आला आहे. मागील सरकारच्या काळात पक्षातील कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे व कोर्ट प्रकरणांची जबाबदारी या सेलकडे देण्यात आली होती.

कार्यकर्त्यांचा अपघात झाल्यानंतर तातडीने मदत पोहचावी, यासाठीही स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांना मुलांना शिक्षणासाठी निवासी शाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी त्यांना मोफत शिक्षण दिले जाते, असे नारा लोकेश यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com