BJP Vs Congress : लोकसभा निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर एनडीएला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीएची सत्ता येणार असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा यावेळी चालला आहे. याउलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी उलटफेर केला आहे.
भाजपसाठी जवळपास आठ राज्यांमध्ये अपेक्षित निकाल लागताना दिसत नाहीत. त्यामध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला तो भाजपचा गड असलेल्या उत्तर प्रदेशात. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भाजपला 80 पैकी केवळ 37 जागांवर आघाडी आहे. तर इंडिया आघाडीचे 42 उमेदवार आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत भाजपला 62 जागा मिळाल्या होत्या.
बिहारमध्येही एनडीएच्या जागा कमी झाल्या आहेत. मागील निवडणुकीत एनडीएला 40 पैकी 39 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा 31 वरच थांबण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला सात तर इतरांना दोन जागा मिळताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात एनडीएला मोठा दणका बसला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, एनडीएला केवळ 18 जागांवर आघाडी आहे. तर इंडिया आघाडीचे 29 उमेदवारी आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत एनडीएचे 41 उमेदवार विजयी झाले होते.
राजस्थानमध्येही भाजपला धक्का बसला आहे. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपने सर्व 25 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र, वेगळे चित्र आहे. यावेळी भाजपच्या पारड्यात केवळ 14 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसचे उमेदवार आठ जागांवर विजयी होऊ शकतात.
हरियाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाममधील मतदारांनीही यावेळी भाजपला फारशी साथ दिलेली नाही. बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींचा करिष्मा चालला आहे. भाजपला यावेळी चार जागा कमी होताना दिसत आहे. भाजपचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत.
कर्नाटकमध्ये भाजपच्या नऊ जागा कमी झाल्या आहेत. एनडीएला यावेळी केवळ 17 जागांवर आघाडी असून 9 जागा कमी होत आहेत. तर काँग्रेसला तब्बल 10 जागांचा फायदा होणार आहे. यावेळी पक्षाच्या 11 जागा निवडून येऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.