Wardha Talathi Bharti Exam: वर्ध्यात तलाठी भरतीच्या परीक्षेत गोंधळ; परीक्षा केंद्रावरील कर्मचारीच संशयाच्या भोवऱ्यात

Wardha Examination Centre : परीक्षा केंद्रावरील कर्मचारी परीक्षा सुरू असताना लॅपटॉप घेऊन बाहेर गेल्याचा व्हिडिओ व्हायरल
Talathi Bharti Exam
Talathi Bharti ExamSarkarnama

Nagpur News: तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून जवळपास एक हजार रुपये शुल्क घेऊनही ऐन परीक्षेच्या दरम्यान अनेक समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून दररोज नवनवीन गोंधळ समोर येत आहेत.

राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर सोमवारी 'सर्व्हर डाऊन' झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावरील चक्क कर्मचारीच संशयाच्या भूमिकेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

तलाठी भरतीची परीक्षा 17 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. मात्र, वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावरील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका परीक्षा केंद्रावरील काही कर्मचारी परीक्षा सुरू असताना लॅपटॉप घेऊन बाहेर गेल्याचे दिसत आहे. यावर उमेदवारांनी आक्षेप घेतला असता संबधित व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

Talathi Bharti Exam
Karad NCP News : भरती प्रक्रियेतील काळाबाजार बाहेर काढणार : रोहित पवार यांचा इशारा

"आतमध्ये मोबाईल जॅमर लावण्यात आल्यामुळे नेटवर्क नसल्याने आपण पेपर डाऊनलोड करण्यासाठी बाहेर गेलो होतो", असे उत्तर संबधित व्यक्तीने दिले. त्यामुळे आता या परीक्षा केंद्रावरील कर्मचारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा व्यक्ती परीक्षार्थी नसल्याने त्याला प्रश्नपत्रिकेची गरज काय? यासह अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

Talathi Bharti Exam
Talathi Recruitment News: तलाठी भरती परीक्षेत 'सावळागोंधळ'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, केली 'ही' मोठी मागणी

या प्रकारानंतर आता स्पर्धा परीक्षा समन्वय समिती देखील आक्रमक झाली असून सरकारने त्वरित तलाठी भरती स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार यावर काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडून एवढे शुल्क घेतले असतानाही परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या ढिसाळ कारभारावर आता राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com