Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडच्या जनतेला भावली मोदींची गॅरंटी...

Chhattisgarh Election News : सध्याच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 51 जागांवर आघाडीवर आहे.
Chhattisgarh Assembly Election 2023
Chhattisgarh Assembly Election 2023Sarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Assembly News : छत्तीसगड राज्याच्या आघाडीवर असलेल्या जागांवर नजर टाकली, तर भाजप बहुमतापेक्षा तीन जागांवर आघाडी घेऊन आहे. काँग्रेसने सत्ता कायम राखण्यासाठी निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासनांचा भडीमार केला होता. (Chhattisgarh Result News)) दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी `छत्तीसगड गृह लक्ष्मी योजना` जाहीर करत त्या अंतर्गत महिलांना दरवर्षी १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या शिवाय शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही काँग्रेसने प्रामुख्याने उचलला होता.

Chhattisgarh Assembly Election 2023
Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये भाजप-काॅंग्रेसमध्ये पाठशिवणीचा खेळ...

खरतर हे प्रभावी मुद्दे बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पुन्हा छत्तीसगडची सत्ता मिळेल असे वाटत होते. परंतु आतापर्यंतच्या कलानुसार छत्तीसगडमध्ये भाजप पुनरागमन करताना दिसत आहे. (BJP) भाजपच्या प्रचाराचे वन मॅन शो असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गॅंरटीवर छत्तीसगडच्या जनतेने विश्वास ठेवला, असेच म्हणावे लागेल.

सध्याच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप 51 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 38 ठिकाणी आघाडी घेऊन आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगड निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील प्रश्नांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यावर सर्वाधिक भर दिला होता. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला डॅमेज करण्यासाठी भाजपने मोदींची गॅरंटी देत विवाहित महिलासाठी दरवर्षी 12 हजार रुपये देणारी `महातारी लक्ष्मी` योजना राबवण्याचे आश्वासन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या शिवाय पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची हमी दिली. कुठेतरी छत्तीसगडच्या मतदारांनी मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून 3100 रुपये प्रतिक्विंटल दराने भात खरेदी, महिलांना वर्षांला 12 हजार रुपये, गरीब कुटुंबांतील महिलांना 500 रुपयांना स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, एक लाख तरुणांना रोजगार या आश्वासनांवर छत्तीसगडच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, असे सध्याच्या चित्रावरून तरी दिसते.

दुसरीकडे काँग्रेसने भूपेश बघेल यांचाच चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे केला, याचा फटका काँग्रेसला बसल्याचे दिसते. या शिवाय विद्यमान 22 आमदारांना उमेदवारी नाकारण्याचे केलेले धाडस काँग्रेसच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे. याउलट भाजपने मुख्यमंत्री पदासाठी सध्या तरी कुठेलेही नाव पढे न आणता मोदी यांच्या नावावरच मते मागितली.

2014 पासून सुरू असलेला मोदींचा करिश्मा आता संपला आहे, असे चित्र काँग्रेसने कर्नाटक राज्यातील सत्तेनंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण छत्तीसगडच्या मतदारांनी तोही खोटा ठरवला असे दिसते. आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल म्हणून पाच राज्यांतील निकालांकडे पाहिले जाते. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप पाचपैकी तीन राज्यांत सत्तेवर येण्याची शक्यता आहे. हे पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत `मोदी है तो मुमकीन है`, असा दावा भाजपने केला तर तो चुकीचा ठरणार नाही, असे दिसते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com