CJI Gavai video viral : बूटफेक प्रकरणाचा ‘तो’ व्हिडीओ सरन्यायाधीश गवईंनीही पाहिला; आज भर कोर्टात काय म्हणाले?

Chief Justice BR Gavai Addresses Fake Video Controversy : सरन्यायाधीश गवई यांनीही सोशल मीडिया व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
Chief Justice of India Bhushan Gavai
Chief Justice of India Bhushan GavaiSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. बूटफेक प्रकरणानंतर सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंनी खळबळ : काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर सोशल मीडियात काही एआय जनरेटेड मॉर्फ्ड व्हिडीओ आणि बनावट फोटो व्हायरल झाले.

  2. सुप्रीम कोर्टात एआयवरील सुनावणीदरम्यान टिप्पणी : सोमवारी एका याचिकेवर सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी सोशल मीडियातील व्हिडीओबाबत टिप्पणी केली आहे.

  3. एआयच्या वापरावर नियंत्रणासाठी मागणी : या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेत वाढत्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराबाबत चिंता व्यक्त केली आणि नियंत्रणासाठी धोरण तयार करण्याची मागणी केली.

Morphed Video Circulates on Social Media After Supreme Court Incident : सुप्रीम कोर्टात काही दिवसांपूर्वी एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. देशभरात हे प्रकरण चांगलेच गाजले. या घटनेनंतर सोशल मीडियात काही बनावट फोटो, व्हिडीओही व्हायरल करण्यात आले. हाच मुद्दा आज पुन्हा एकदा कोर्टात चर्चेला आला.

सोशल मीडियात सध्या काय सुरू आहे, याबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सोमवारी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान टिप्पणी केली. भारतीय न्यायालयांमध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग नियंत्रित करणय्साठी धोरण तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेतील वाढत्या एआयच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत काही संभाव्य धोके व त्रुटींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. ‘हे न्यायालयही एआयचा वापर करत आहे. पण यामध्ये काही कमतरता आहेत,’ असे वकिलांनी सांगताच सीजेआय गवई म्हणाले, आम्हाला याबाबत माहीत आहे. आम्ही आमचा मॉर्फ्ड व्हिडीओ पाहिला आहे.

Chief Justice of India Bhushan Gavai
Mohan Bhagwat on Congress : …तर काँग्रेसलाही पाठिंबा, आम्ही कोणत्याही एका पक्षाचे नाही! मोहन भागवत यांच्या विधानाने चर्चांना उधाण

सरन्यायाधीशांनी त्यांच्या मॉर्फ्ड व्हिडीओबाबत सूचकपणे यावेळी भाष्य केले. सोशल मीडियामध्ये बूटफेक प्रकरणाचा एक एआय जनरेटेड व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असून काही राज्यांमध्ये याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. 

दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनीही सोशल मीडिया व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बनावट व्हिडीओ प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. या व्हिडीओंबाबतही सरन्यायाधीशांनी कठोर शब्दांमध्ये भाष्य केलेले नाही.

Chief Justice of India Bhushan Gavai
Maharashtra Government decision : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ निर्णय; फडणवीसांकडून अजितदादा अन् शिंदेंना शह की आणखी काही?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. बूटफेक प्रकरणात काय घडले होते?
एका वकिलाने सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

Q2. एआय व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे का?
होय, काही राज्यांमध्ये आयटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत.

Q3. सुप्रीम कोर्टात एआयचा वापर कसा होतो?
न्यायालये एआयचा वापर केस ट्रॅकिंग, संशोधन, दस्तऐवज विश्लेषण आणि न्यायनिर्णय संदर्भ शोधण्यासाठी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com