CJI Bhushan Gavai: बूटफेकीच्या घटनेवर देशभरात संताप! सरन्यायाधिशांनी दिली पहिली प्रतिक्रिया; CJI भूषण गवई म्हणाले, एक अध्याय...

CJI Bhushan Gavai: सरन्यायाधिशांवर बूटफेकीचा प्रकार भर कोर्टात घडला होता, एका ज्येष्ठ वकिलाकडून हे कृत्य करण्यात आल्यानं देशभरातून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला.
“Supreme Court Bar Association takes strict disciplinary action against Advocate Rakesh Kishore for misconduct during court proceedings before Justice B R Gavai.”
“Supreme Court Bar Association takes strict disciplinary action against Advocate Rakesh Kishore for misconduct during court proceedings before Justice B R Gavai.”Sarkarnama
Published on
Updated on

CJI Bhushan Gavai: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकीचा प्रकार भर कोर्टात घडला होता, एका ज्येष्ठ वकिलाकडून हे कृत्य करण्यात आल्यानं देशभरातून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला. पण सरन्यायाधिशांनी संबंधित वकिलांवर कुठलीही कारवाई केली नाही किंवा कारवाईसाठी आदेशही दिले नाहीत. उलट त्याकडं दुर्लक्ष करत त्यांनी आपली कोर्टातील कामकाज पूर्ण केलं. पण याची खबर बाहेर कळताच देशभरातून मोठा संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणावर आता CJI भूषण गवई यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“Supreme Court Bar Association takes strict disciplinary action against Advocate Rakesh Kishore for misconduct during court proceedings before Justice B R Gavai.”
Nilesh Ghaiwal : राम शिंदेंसोबत कनेक्शनच्या आरोपानंतर तासाभरातच भाजपनं रोहित पवारांसोबतचे घायवळचे फोटो काढले बाहेर

सरन्यायाधिश काय म्हणाले?

बूटफेकीच्या या घटनेवर बोलताना गुरुवारी सरन्यायाधिश भूषण गवई म्हणाले, सोमवारी जे काही झालं त्यामुळं मी आणि माझे सहकारी न्यायाधिश विनोद चंद्रन स्तब्ध झालो होतो. पण आता आमच्यासाठी हा आता एक घडून गेलेला अध्याय आहे. त्याचबरोबर हे प्रकरण आता पुढे आणखी न वाढवण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. सरन्यायाधिशांची ही टिप्पणी त्यावेळी आली आहे.

जेव्हा कोर्टानं वनाशक्ती निकालाशी संबंधित पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करत असताना या खंडपीठात जस्टिस उज्जल भुयान हे देखील सहभागी होते. त्यांनी वकील राकेश किशोर यांच्या या हरकतीवर तिखट प्रतिक्रिया दिली. या कृतीवर कठोर कारवाई व्हायला हवी होती, असं त्यांनी म्हटलं. ही कृती म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचं त्यांनी म्हटलं. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा प्रकार अक्षम्य असल्याचं म्हटलं आहे. तसंच सरन्यायाधिशांच्या सन्मान आणि संयमाची प्रशंसा केली. तर दुसरीकडं वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण आता इथेच संपवून टाकावं असं म्हटलं.

“Supreme Court Bar Association takes strict disciplinary action against Advocate Rakesh Kishore for misconduct during court proceedings before Justice B R Gavai.”
Kokate Rummy Video : कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ रोहित पवारांपर्यंत कसा पोहोचला? सगळी चौकशी करण्यासाठी पोलिसांना फ्री हॅन्ड

काय आहे प्रकरण?

सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान ७१ वर्षीय वकील राकेश किशोर तिवारी यानं सरन्यायाधिशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा वकिल कोर्टात सरन्यायाधिशांच्या डायसपर्यंत पोहोचला आणि पायातील बूट काढून त्यानं तो भिरकावला. यानंतर त्यानंतर सनातनचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा आशयाची घोषणाबाजीही केली. त्यानंतर कोर्टात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं. या घटनेनंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियानं या विकलाचं लायसन्स तात्काळ रद्द केलं. दरम्यान, या हल्लेखोर वकिलानं आपल्याला या कृतीचा कुठलाही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.

“Supreme Court Bar Association takes strict disciplinary action against Advocate Rakesh Kishore for misconduct during court proceedings before Justice B R Gavai.”
Dhananjay Munde News : जीव गेल्यावर आरक्षण मागायचे कुणासाठी? बांधवांनो टोकाचं पाऊल उचलू नका! धनंजय मुंडेंचे आवाहन

SCBA ची कारवाई

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशननं (SCBA) गुरुवारी राकेश किशोर तिवारी (वय ७१) याची सदस्यता तात्काळ रद्द केली. कारवाई करताना SCBAनं म्हटलं की, तिवारी यांची कृती ही अत्यंत संतापजनक, चुकीची आणि अतिशयोक्तीयुक्त होती. हा थेटपणे न्यायिक स्वातंत्र्यावर हल्ला होता. ही वकिलीचा पेशा, कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठेचं गंभीर उल्लंघन होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com