Nilesh Ghaiwal : राम शिंदेंसोबत कनेक्शनच्या आरोपानंतर तासाभरातच भाजपनं रोहित पवारांसोबतचे घायवळचे फोटो काढले बाहेर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ याचे भाजपच्या नेत्यांसोबत घनिष्ट संबंध आहेत असा आरोप आमदार रोहित पवार यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला.
Nilesh Ghaiwal passport
Nilesh Ghaiwal passportSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Ghaiwal : भारताबाहेर पळून गेलेला गुंड निलेश घायवळ याचे आणि भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे घनिष्ट संबंध असल्याचा तसंच या घायवळला पळून जाण्यास एकनाथ शिंदेंच्या सहकारी आमदारांनी मदत केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत केला. यावेळी त्यांनी घायवळच्या कनेक्शनबाबत अनेक धक्कादायक आरोप केले. यासंदर्भातील काही व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणले. पण रोहित पवार सातत्यानं घायवळ प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असताना आता हा वार त्यांच्यावर उलटला आहे. कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर तासाभरातच भाजपनं रोहित पवारांसोबतही निलेश घायवळचे काही फोटो समोर आणले आहेत.

Nilesh Ghaiwal passport
Top 10 News: तयारीला लागा..! दिवाळीनंतर 'स्थानिक'च्या निवडणुकांचा धुरळा उडणार? ते नवी मुंबई विमानतळासाठी अखेर दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

रोहित पवारांनी काय केले होते आरोप?

भाजप (BJP) नेते आणि विधान परिषदेचे सध्याचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारसभेत गुंड निलेश घायवळ भाषण करत असतानाचा एक व्हिडीओ रोहित पवारांनी समोर आणला आहे. यामध्ये गुंड घायवळ हा राम शिंदेंच्या पाया पडताना दिसतो आहे. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्यावेळी निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसतो आहे. त्यामुळं गुंड निलेश घायवळ आणि आमदार राम शिंदे यांचे लागेबंधे असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात शिंदेंच्या आमदारांनी निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

तानाजी सावंतांच्या कुटुंबातील व्यक्तींची घायवळला मदत झाली असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला. घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून पळून गेला. त्याला सोडायला कोण गेले याची आपल्याकडे माहिती आहे. राम शिंदेंनी बाजार समिती निवडणुकीसाठी घायवळचा उपयोग केला. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर राम शिंदे किंवा थेट गृहमंत्र्यांचाच दबाव असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला.

रोहित पवार यांच्यासोबतचे फोटो

दरम्यान, आरोपी गुंड निलेश घायवळ याचे खुद्द रोहित पवार यांच्यासोबतचे फोटो आता भाजपचे नेते नवनाथ बन यांनी समोर आणले आहेत. त्यांनी ट्विट केलं असून यामधील फोटोला कॅप्शन देताना खोचक टीकाही भाजपनं केली आहे. "आमदार रोहितजी पवार यांचे सचिन घायवळ यांच्यासोबतचे काही फोटो समोर आले आहेत. शस्त्र परवान्यासाठी अर्ज कसा करायचा? याचं मार्गदर्शन रोहित करत होते का? असे सवाल विचारत, यह रिश्ता क्या कहलाता है? अशा शब्दांत भाजपनं रोहित पवारांवर पलटवार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com