CM Siddaramaiah: पोलीस अधिकाऱ्यावर उचलला हात! पत्रकाराला विचारलं भाजपचा आहेस का?; अखेर मुख्यमंत्र्यांची विनवणी करताना दमछाक

CM Siddaramaiah : सिद्धरामय्या यांच्या अशा मुजोर कृतींमुळं ते अनेकदा अडचणीत आले आहेत. आत्ताही कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची मागणी देखील होऊ लागली आहे.
CM Siddaramaiah Controversy
CM Siddaramaiah Controversy
Published on
Updated on

CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भर सभेमध्ये एका अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा तसंच यासंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला देखील अपमानित केल्याचा प्रकार घडला आहे. सिद्धरामय्या यांच्या या कृतीमुळं संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. या अधिकाऱ्याचा राजीनामा मागे घेण्यासाठी आता सरकार केविलवाणी धडपड करताना दिसतं आहे.

CM Siddaramaiah Controversy
Amit Deshmukh : अडीच वर्षापासून सिटी स्कॅन, एमआरआय बंद! सरकारकडे पैसा नाही का? अमित देशमुखांचा सवाल

नेमकं काय घडलं?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक एन. व्ही. बारामनी यांनी गेल्या महिन्यात स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्याचं कारण ठरले होते मुख्यमंत्री सिद्धरामय्या. एप्रिल महिन्यात बेळगाव इथं काँग्रेसच्या एका जाहीर सभेत व्यासपीठावर बारामनी उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान, काही भाजपचे कार्यकर्ते अचानक विरोधीत घोषणाबाजी करायला लागले आणि सरकारविरोधात काळे झेंडे देखील दाखवले. त्यामुळं मुख्यमंत्री चिडले आणि त्यांनी थेट बारामनी यांच्या कानशिलात लगावण्यासाठी हात उगारला, पण त्यांना थप्पड मारली नाही. पण यामुळं भर सभेत आपला अपमान झाला असल्याचं बारामनी यांनी म्हटलं आहे.

CM Siddaramaiah Controversy
PM Modi Ghana Visit : घानाच्या राष्ट्राध्यक्षांकडून मोदींचा गौरव; द्विपक्षीय संबंधांमध्ये 'या' करारांवर स्वाक्षऱ्या

राजीनामा मागे घेण्यास तयार नाही

या प्रकारानंतर बारामनी यांनी १४ जून रोजी गृह सचिवांकडं आपला राजीनामा सोपवला. या राजीनाम्यात त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे त्यांच्यावर शेकडो लोकांच्या गर्दीसमोर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ओरडले आणि त्यांना कानाखाली मारण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या या कृतीमुळं मला थप्पड लागवली नाही पण माझा अपमान झाला आहे. या घटनेमुळं मी निराश झालो असून यामुळं माझ्या कुटुंबाला देखील खूप त्रास झाला आहे.

दरम्यान, सरकारनं अद्याप बारामनी यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्विकारला नाही. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बारामनी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंतीही केली. पण तरीही बारामनी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं कळतं आहे.

CM Siddaramaiah Controversy
Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिन चिट मिळताच राऊतांचा CM फडणवीसांसह नितेश राणेंवर हल्लाबोल

पत्रकाराचा केला अपमान

दरम्यान, काल बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना अचानक एका पत्रकारानं मुख्यमंत्र्यांना बारामनी यांच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली. तर त्यावर CM सिद्धरामय्या पुन्हा एकदा भडकले आणि त्यांनी या पत्रकाराला तू भाजपचा आहेस का? असा प्रतिप्रश्न करत अपमानित केलं. तसंच अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही का विचारत आहात? असा सवालही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com