Narendra Modi News : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट ; राम मंदिराच्या कामाचा घेतला आढावा

Uttar Pradesh News : राम मंदिराच्या कामाचा घेतला आढावा
Narendra Modi, Yogi Adityanath News
Narendra Modi, Yogi Adityanath NewsSarkarnama

Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. अयोध्येतील राम मंदीराच्या प्राण प्रतिष्ठा समारोहाचे मुख्यमंत्री योगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले. 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान, श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये 1 तास 10 मिनिटे चर्चा झाली. अयोध्येतील पूर्ण कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.

या बैठकीला नगर विकास मंत्री अरविंद शर्मा यांच्यासह अधिकारी गौरव दयाल उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सोबतचा फोटा फोटोही ट्वीटवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सौजन्याने भेट घेतल्यानंतर त्यांचा बहुमोल सल्ला मिळाला.

Narendra Modi, Yogi Adityanath News
Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाल्या,'' २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी...

योगी आदित्यानाथ यांनी ट्वीट करत म्हणाले, "तुमचे अमूल्य मार्गदर्शन 'नवीन उत्तर प्रदेश' (Uttar Pradesh) ला 'विकसित भारत @ 2047' च्या संकल्पाच्या पूर्ततेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी शक्ती प्रदान करते. तुमच्या व्यस्त दिनचर्येतून मौल्यवान वेळ दिला. धन्यवाद. राज्य सरकारच्या कामकाजासह इतर मुद्द्यांवरही दोघांमध्ये चर्चा झाली.

श्रीराम मंदिरात पहिल्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे राम मंदिराचे सुमारे 70 टक्के काम झाल्याचा दावा केला जात आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार मंदिराचे गर्भगृह तयार आहे. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील खांब बसविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

Narendra Modi, Yogi Adityanath News
Arvind Kejriwal News : "इंडिया'आघाडीचे नाव बदलून भारत केले तर...": मुख्यमंत्री केजरीवालांचा सवाल

पहिल्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना होणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. तळमजल्यावर फिनिशिंगच्या कामासोबतच दरवाजे बसवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com