
Chief Ministers Wealth ADR Report : आंध्रपद्रेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू 931 कोटींपेक्षाही अधिक संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी केवळ 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्री असल्याचे समोर आले आहे. सोमवारी जारी झालेल्या असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स(एडीआर)च्या रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, राज्य विधानसभा आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती 52.59 कोटी रुपये आहे. तर भारतातील प्रति व्यक्ति नेट नॅशनल इनकम 2023-2024 साठी जवळपास 1,85,854 रुपये होती. तर एका मुख्यमंत्र्याची सरासरी वैयक्तिक कमाई 13,64,310 रुपये आहे, जी भारताच्या सरासरी प्रति व्यक्ति उत्पन्नाच्या जवळपास 7.3 टक्के आहे. देशातील 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपये आहे. देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ दोन महिला आहेत, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी(Mamta Banarjee) आणि दिल्लीच्या आतिशी.
रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू 332 कोटी रुपयांपेक्षाही अधिक संपत्तीसह दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर कर्नाटकाचे सिद्धरमय्या 51 कोटी रुपयांपेक्षाही अधिक संपत्तीसह यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. अशाचप्रकारे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला(Omar Abdullah) 55 लाख रुपयांच्या संपत्तीसह यादीत दुसरे सर्वात कमी संपत्ती असणारे मुख्यमंत्री आहेत. तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन ११८ कोटी संपत्तीसह तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे सर्वात जास्त 180 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, सिद्धरमय्यांवर 23 कोटी रुपये आणि नायडू यांच्यावर 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक देणे बाकी आहे. तर ADRच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे 13 कोटींची संपत्ती आहे आणि त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे कर्ज आहे.
ADRच्या रिपोर्टमध्ये हे देखील म्हटले आहे की, 13(42टक्के) मुख्यमंत्र्यांनी आपल्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणं घोषित केली आहेत. तर 10(32 टक्के) जणांनी हत्येचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी आणि गुन्हेगारी धमकीशी संबंधित गंभीर गुन्हेगारी प्रकरणं घोषित केली आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.