
Priest-Granthi Honor Scheme News : राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर मौलाना आणि इमाम हे आपल्या वेतनाची मागणी करत आहेत. दिल्लीत अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीचे सरकार मौलवी आणि इमाम यांना वेतन वाटप करत आहे. तर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना पुजारी आणि ग्रंथींचीही यासाठी आठवण झाल्याचे दिसून येत आहे.
कारण, केजरीवालांनी निवडणुकीसाठी घोषणा करताना म्हटले आहे की, दिल्लीत जर पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आले तर पुजारी आणि ग्रंथींना दर महिन्यास १८ हजार रुपये दिले जातील. तर आम आदमी पार्टीच्या या पुजारी-ग्रंथी सन्मान योजनेने खळबळ माजवली असून, भाजपने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केजरीवालांना टोलाही लगावला आहे.
भाजप(BJP) प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी या योजनेवरून आम आदमी पार्टीवर निशाणा साधत म्हटले की, त्यांनी(आप) इमामांचे वेतन दिलेले नाही. असं कुणीच उरलेलं नाही, ज्याला आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालांनी फसवलेलं नाही. आरटीआयच्या माध्यमातून समजलं आहे की, आम आदमी पार्टी सरकारने घोषणा केली होती की, मौलवी आणि इमाम यांना वेतन भत्ता दिला जाईल.
मात्र वक्फशी जुडलेल्या मौलवी आणि इमाम यांना जानेवारी 2021पासून कोणतेही वेतन दिले गेलेले नाही. म्हणजे घोषणा करून नंतर पलटी मारली आणि त्यांना फसवले. यामुळेच आता मौलवी आणि इमाम हे केजरीवाल यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
त्यांनी पुढे म्हटले की, आम आदमी पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी दावा केला की, अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) तुरुंगात होते त्यामुळे मौलवी आणि इमाम यांना वेतन दिले गेले नाही. केजरीवाल काय इतके महिने तुरुंगात होते का, की १७ महिन्यांचे वेतन थकले? आम आदमी पार्टी खोटारडी आहे. ज्या दोन योजना नव्हत्या त्या लागू करण्याचा दावा करून डेटा गोळा करायला लागली तेव्हा सरकारी विभागाने त्यांना नोटीसही बजावली आहे.
पूनावाला म्हणाले, आम आदमी पार्टी(AAP) आज पुजारी आणि ग्रंथींसाठी योजना आणत आहेत. मात्र आताच त्यांना पुजारी आणि ग्रंथींची आठवण का झाली? दहा वर्षांपासून मौलवी आणि मौलना यांना वेतन दिले जात होते, तेव्हाच पुजारी आणि ग्रंथींसाठीही घोषणा का नाही केली? पंजाबमध्ये किती पुजारी आणि ग्रंथींनी वेतन दिले गेले. पंजाबमध्ये तर हजार रुपये प्रति महिना महिलांना देण्याची घोषणा केली होती, किती महिलांना पैसे मिळाले? आम आदमी पार्टी फसवेगिरी करणाऱ्यांची पार्टी आहे, त्यांनी तर त्यांच्या मतदारांनाही फसवले आहे.
आप सरकारने दिल्लीतील पुरोहितांसाठी एक नवीन योजना आणली आहे. अरविंद केजरीवाल यांनी काल पत्रकार परिषदेत पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीतील पुजारी आणि पुरोहितांना दरमहा १८ हजार रुपये दिले जातील. त्यासाठीची नोंदणीही आजपासून (३१ डिसेंबर) सुरू होणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.