Arvind Kejriwal : केजरीवालांनी वाढवलं भाजपचं टेंशन; या' योजनेची घोषणा करत खेळलं हिंदू कार्ड

Delhi Election 2025: अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीतील पुजारी आणि पुरोहितांना दरमहा १८ हजार रुपये दिले जातील.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आप सरकारने दिल्लीतील पुरोहितांसाठी एक नवीन योजना आणली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीतील पुजारी आणि पुरोहितांना दरमहा १८ हजार रुपये दिले जातील. त्यासाठीची नोंदणीही उद्यापासून म्हणजेच ३१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांना मानधन देण्याची घोषणा केली आहे. पुजारी-ग्रंथी सन्मान योजना असे या योजनेचे नाव आहे.

आमचे सरकार सत्तेवर येताच या योजनेंतर्गत पुजारी आणि पुरोहितांना दरमहा 18 हजार रुपये दिले जातील.  या योजनेसाठी ३१ डिसेंबरपासून कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरातून नोंदणी सुरू होईल.

Arvind Kejriwal
Chetan Tupe : मोठी राजकीय घडामोड! अजितदादांच्या आमदारानं घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, ..तर दोन्ही पवार एकत्र येतील!

या नव्या योजनेच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर ही निशाणा साधला. ते म्हणाले की, आता भाजप ही योजना थांबवू शकत नाही.  माझी भाजपवाल्यांना विनंती आहे  की, महिला सन्मान आणि संजीवनी योजने सारखी हि योजना बंद करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच ज्या राज्यात काँग्रेस आणि भाजप सरकार आहेत.त्यांनी देखील ही योजना लागू करावी अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली.

Arvind Kejriwal
Kolhapur Politics 2024 : प्रस्थापितांना राजकीय उंची दाखवली, 2024 वर्षाने कोल्हापूरच्या राजकरणात झालेले बदल...

रोहिंग्यांच्या मुद्द्यावर केजरीवाल यांनी हरदीप सिंग पुरीच्या अटकेची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले , मी त्यांना हरदीप सिंग पुरीला अटक करण्याची  मागणी करतो करण हरदीप सिंग पुरी आणि अमित शहा यांच्याकडे रोहिंग्यांची वस्ती कशी आणि कुठे झाली याची सर्व माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com