मोठी बातमी! आवाजाची तक्रार करणं पडलं महागात; संतापलेल्या टोळक्याची संगीतकारावर जीवघेणा हल्ला, 7 जण अटकेत

आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर संगीतकारावर संतापलेल्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
मोठी बातमी! आवाजाची तक्रार करणं पडलं महागात; संतापलेल्या टोळक्याची संगीतकारावर जीवघेणा हल्ला, 7 जण अटकेत
Published on
Updated on

घराजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या आरडाओरड आणि गोंधळाची तक्रार करणाऱ्या मणिपूरच्या प्रसिद्ध संगीतकाराचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील आश्रम परिसरातील किलोकरी गावात ही घटना घडली. चोंगथाम विक्रम सिंह (वय 54) असे मृत संगीतकाराचे नाव आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून 7 आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम सिंह यांच्या घरासमोर डिलिव्हरी बॉय आणि ढाब्यातील कर्मचाऱ्यांकडून मोठ्या आवाजात आरडाओरड सुरू होती. या गोंधळामुळे त्रास होत असल्याने सिंह यांनी त्याबाबत तक्रार केली. त्यानंतर ते घराबाहेर आले असता संतापलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.

मोठी बातमी! आवाजाची तक्रार करणं पडलं महागात; संतापलेल्या टोळक्याची संगीतकारावर जीवघेणा हल्ला, 7 जण अटकेत
Sugarcane Crushing Season 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; साखर गळीत हंगाम 'या' तारखेपासून सुरू! मुख्यमंत्री बैठकीत मोठा निर्णय!

आरोपींनी सिंह यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोठी बातमी! आवाजाची तक्रार करणं पडलं महागात; संतापलेल्या टोळक्याची संगीतकारावर जीवघेणा हल्ला, 7 जण अटकेत
IAS Transfer : एकाच झटक्यात 27 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तमिळनाडूत मोठा प्रशासकीय भूकंप! नक्की काय घडलंय?

चोंगथाम विक्रम सिंह हे मणिपूरच्या संगीत क्षेत्रातील परिचित नाव होते. त्यांनी ‘फिनिक्स’, ‘अल्ट्रा व्हायर्स’ आणि ‘ईस्टर्न डार्क’ यांसारख्या बँडसोबत काम केले होते. दिल्लीमध्ये ते संगीत शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका याबाबत अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com