Parliament Security Breach : दिल्ली पोलिसांना झटका; संसद सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Delhi Police : संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी सध्या दिल्ली पोलिसांकडे आहे.
Parliament Security Breach
Parliament Security BreachSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Security Breach : संसदेची सुरक्षाव्यवस्था भेदून थेट लोकसभेत घुसखोरी करत दोन तरुणांनी 13 डिसेंबर रोजी देशात खळबळ उडवून दिली. या घटनेनंतर सुरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. संसदेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने मोदी सरकार आता सतर्क झाले असून संसदेच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. संसदेची सुरक्षा आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे दिली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेची (Parliament Security) जबाबदारी सध्या दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरू असताना 13 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरी केली. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर बुधवारी रात्री आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अत्यंत नियोजनबद्धपणे घुसखोरीचे षडयंत्र रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

Parliament Security Breach
Lok Sabha Election : ‘इंदिरा भवन’मधून ठरणार काँग्रेसची रणनीती; मुहूर्त नवीन वर्षाचा

घुसखोरांनी बुटात स्मोक कँडल लपवून आणले होते. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. आता केंद्र सरकारने संसदेचे सुरक्षा कडे अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘सीआयएसएफ’कडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. संसद इमारतीतील सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाकडेच कायम राहणार असली तरी बाहेरील सर्व सुरक्षा ‘सीआयएसएफ’च्या हातात येणार आहे.

संसदेतील सुरक्षेच्या त्रुटींबाबत तपास करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने हा बदल सुचवला आहे. तसेच लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचारीही यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत.

दरम्यान, सुरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांनी संसद दणाणून सोडली आहे. त्यामुळे कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आतापर्यंत 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले असून आज दिल्लीत मोर्चाही काढण्यात आला.

(Edited By - Rajanand More)

Parliament Security Breach
Congress : काँग्रेसला समोसाही परवडेना; भाजपची संपत्ती डोळे दीपवणारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com