
Indira Gandhi’s Victory and Defeat Referenced in Court : सुप्रीम कोर्टात राष्ट्रपतींशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे. नेपाळमध्ये सध्या धुमश्चक्री सुरू असून युवकांच्या तीव्र आंदोलनामुळे पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे. देशात आणीबाणीची निर्माण झाली असून आंदोलनात जवळपास 22 युवकांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळमधील सर्व सेवा कोलमडून पडल्या आहेत. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश गवई यांनीही त्याअनुषंगाने भारतीय संविधानाच्या महानतेकडे लक्ष वेधले. प्रेसिडेंशियल रेफरन्सशी संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तीवाद करत होते. त्यांनी संविधानाचे महत्व पटवून देताना भारतातील आणीबाणीचा उल्लेख केला.
तुषार मेहता म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावल्यानंतर जनतेनेच त्यांना धडा शिकवला. काँग्रेसची सत्ताही गेली. एवढेच नाही तर इंदिरा गांधींचाही पराभव झाला. त्यानंतर दुसरे सरकार आले. पण जेव्हा हे सरकार टिकू शकले नाही, त्यानंतर त्याच जनतेने इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेत आणले. ही संविधानाची ताकद आहे.
मेहता यांच्या या विधानानंतर सरन्यायाधीश गवई यांनीही लगेच तेही प्रचंड बहुमताने निवडून आल्या, असे म्हटले. मेहतांनीही त्यावर सहमती दर्शवत म्हटले की, ‘होय, हीच आपल्या संविधानाची खरी ताकद आहे. हा राजकीय तर्क नाही तर सत्य आहे.’ त्यानंतर सरन्यायाधीशांनीही त्यावर महत्वपूर्ण टिप्पणी करताना शेजारील देशांकडे बोट दाखवले.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, ‘आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान आहे. शेजारील देशांकडे पाहा, नेपाळमध्ये आपण पाहतोय.’ त्यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी लगेच बांग्लादेशमध्येही, असे म्हटले. सुप्रीम कोर्टातील ही टिप्पणी नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.
नेपाळमध्ये आंदोलकांनी सरकारविरोधात जणू युध्द पुकारले आहे. संसदेसह सुप्रीम कोर्टाच्या इमारतीलाही आग लावण्यात आली आहे. अनेक सरकारी इमारती, राजकीय नेत्यांचे बंगले पेटविण्यात आले आहेत, तोडफोड करण्यात आली आहे. नेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाणीच्या घटनाही घटल्या आहेत. देशात राजकीय संकट उभे राहिले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले आहे. नेपाळच्या आर्थिक स्थितीवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.