CJI Dhananjay Chandrachud News : सुप्रीम कोर्टाला 'तारीख पे तारीख' देणारी संस्था होऊ देणार नाही; सरन्यायाधीशांनी वकिलांना सुनावले

CJI Dhananjay Chandrachud News : प्रकरणं दाखल करण्याच्या आणि न्यायालयाच्या सुधारणेच्या प्रक्रियेवरही याचा परिणाम होतो.
CJI Dhananjay Chandrachud News
CJI Dhananjay Chandrachud NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायालयापुढील खटल्यांबाबत होणाऱ्या 'तारीख पे तारीख'च्या न्यायालयीन पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे की, न्यायालयाची आता 'तारीख पे तारीख' सारखी पद्धती होऊ देणार नाही. प्रकरणं दाखल करण्याच्या आणि न्यायालयाच्या सुधारणेच्या प्रक्रियेतवरही याचा परिणाम होतो. सोबतच त्यांनी बारच्या सदस्यांना आवाहन केले आहे की, अतिआवश्यक असेल तेव्हाच प्रकरणांना स्थगिती मागावी. प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. (Latest Marathi News)

CJI Dhananjay Chandrachud News
Manoj Jarange On Sadavarte : मराठा आंदोलक विरोधातल्या सदावर्तेंच्या याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया; 'त्याच्या बुद्धीप्रमाणे...'

आज शुक्रवारी (दि.३ नोव्हे.) सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अशा प्रकरणांची माहिती दिली ज्यामध्ये स्थगितीची मागणी केली जात होती. ते म्हणाले "अवघ्या दोन महिन्यांत 3 हजार 688 प्रकरणांमध्ये स्थगितीची मागणी करण्यात आली आहे, तर बहुतांश प्रकरणे तातडीने सुनावणीसाठीची होती. आम्ही न्यायालयांना तारीख पे तारीख देणाऱ्या कार्यपद्धतीचे होऊ देणार नाही. इतकी प्रकरणे जर दीर्घ काळ प्रलंबित राहत असतील तर ते न्यायालयाच्या प्रतिमेसाठी चांगले नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'न्यायालयात प्रकरण दाखल करण्यापासून ते पहिल्या सुनावणीसाठी येईपर्यंतच्या प्रक्रियेवर मी लक्ष ठेवून आहे, यासाठी कमीत कमी वेळ लागेल, याची खबरदारी घेत आहे. जर आपण माझ्याकडे असलेल्या माहितीशी याची तुलना केली, तर असे दिसून येते की आज एका दिवसातील 178 प्रकरणांमध्ये स्थगितीची मागणी करण्यात आली आहे.

CJI Dhananjay Chandrachud News
NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

'दररोज सरासरी १५४ प्रकरणे तहकूब होतात. गेल्या दोन महिन्यांत एकूण 3688 निकालपत्रे झाली आहेत. त्यामुळे खटला दाखल करून सुनावणीसाठी यादी करण्याचे प्रयत्न कमी पडतात. या कालावधीत स्थगित केलेल्या प्रकरणांची संख्या सूचीबद्ध प्रकरणांपेक्षा तीन पट जास्त होते. या प्रकरणांवर लवकरच सुनावणी होणे अपेक्षित असताना, याच प्रकरणांमध्ये पुन्हा स्थगिती मागितली जात आहे. 'मी बारच्या सदस्यांना विनंती करतो की, ते गरजेचे असल्याशिवाय प्रकरणांना स्थगिती मागू नका, न्यायालयाला तारीख पे तारीखे द्यायला लावू नये."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com