Dhananjay Chandrachud : माझी विश्वासार्हता पणाला! सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले? 

Supreme Court Chief Justice : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांवर नाराजी व्यक्त करताना हे विधान केले आहे.
CJI Dhananjay Chandrachud
CJI Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टात वकिलांबाबत नाराजी व्यक्त केली. वकिलांनी एक नवी प्रथा सुरू केली आहे. वेगवेगळे वकील एकच प्रकरण सातत्याने खंडपीठासमोर आणत तारीख मागत असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. पारदीवाला व मनोज सिन्हा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी कोळसा खाणीसंदर्भात एक प्रकरण आले. त्यावर कोर्टाने वकिलांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली.

हे प्रकरण सोमवारीही खंडपीठासमोर आले होते. आपल्या बाजूने आदेश मिळण्यासाठी एकच प्रकरण सातत्याने पुढे आणण्याची प्रथा थांबवण्याची गरज असल्याचे कोर्ट म्हणाले.

CJI Dhananjay Chandrachud
Chandrababu Naidu : कोर्टाने झापल्यानंतर चंद्राबाबूंचा मोठा निर्णय; तिरुपती लाडू प्रकरणाचे काय होणार?

विश्वासार्हता पणाला 

सीजेआय चंद्रचूड म्हणाले की, ही एक नवी प्रथा आहे. वेगवेगळ वकील एकच प्रकरण सुचीबध्द करण्यासाठी मांडतात. तुम्ही सर्वजण संधी साधत आहात. सरन्यायाधीश म्हणून माझ्याकडे जो थोडाफार विवेक आहे, त्याचा वापर मी तुमच्या बाजूने कधीही करणार नाही. तुम्ही कोर्टाला भटकवू शकत नाही. माझी विश्वासार्हता पणाला लागली आहे. मला सर्वांसाठी मानक नियमांचे लान करायला हवे, असेही सरन्यायाधीशांनी ठणकावले.

CJI Dhananjay Chandrachud
Supreme Court : मंदिर असो वा दर्गा, हटवायला हवे! बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाने दाखवला आरसा

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सोमवारीच एका वकिलांना फटकारले होते. कोर्टात Yeah Yeah असे शब्द संबंधित वकिलांनी उच्चारले होते.  हे ऐकून सरन्यायाधीश भडकले होते. ‘हे कोणते कॉफी शॉप नाही. हे Yeah, Yeah काय आहे. मला अजिबात आवडणार नाही. कोर्टात याची परवानगी दिली जाऊ शकत नाही’, असे शब्दांत सीजेआय चंद्रचूड यांनी संताप व्यक्त केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com