Chandrababu Naidu : कोर्टाने झापल्यानंतर चंद्राबाबूंचा मोठा निर्णय; तिरुपती लाडू प्रकरणाचे काय होणार?

Tirupati Laddu Case Supreme Court : सुप्रीम कोर्टाने सोमवारी सुनावणीदरम्यान चंद्राबाबू नायडू यांना चांगलेच फटकारले होते.  
Tirupati Laddu Case
Tirupati Laddu CaseSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारीच चंद्राबाबूंना फटकारले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाच्या SIT चौकशीबाबत मोठे पाऊल उचलले आहे.

प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांच्या चरबीचे अंश आढळून आल्याचा दावा चंद्राबाबूंनी केला आहे. त्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली असून सोमवारपर्यंत तपासही सुरू होता.

Tirupati Laddu Case
India Vs China : चीन सीमेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुखांचा मोठा दावा; म्हणाले, आम्ही सज्ज!

याप्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने प्रसादामध्ये भेसळ असल्याचे रिपोर्टवरून स्पष्ट होत नाही. एका संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोणताही आधार नसताना याबाबत मीडियाला माहिती देणे योग्य नसल्याचे सांगत कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती.

कोर्टाने राज्य सरकारच्या एसआयटीमार्फतच चौकशी सुरू ठेवायची की स्वतंत्र समिती नेमायची, याबाबत केंद्र सरकारला बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यावर दोन दिवसांनी सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या या निर्देशानंतर चंद्राबाबूंनी एसआयटी चौकशीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोर्टाचे स्पष्ट आदेश येईपर्यंत या प्रकरणाची चौकशी थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tirupati Laddu Case
Supreme Court : मंदिर असो वा दर्गा, हटवायला हवे! बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाने दाखवला आरसा

याबाबत आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक द्वारका तिरुमला राव यांनी सांगितले की, तिरुपती लाडू भेसळप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. कोर्टात 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे.

चंद्राबाबू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर जगनमोहन यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात तसेच हायकोर्टातही धाव घेतली आहे. जगनमोहन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून चंद्राबाबूंना तंबी देण्याची विनंती केली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com