Delhi Tiranga March: 'सीजेपी'च्या 'लहरा दो तिरंगा' मार्चला मोठा धक्का, NDMC चा सेंट्रल पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय, अभिजीत दिपके संतापले

New Delhi Protest: नवी दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिल (NDMC) नं गुरुवारी (ता.15 ऑक्टोबर) नोटीस जारी केली आहे. या नोटिसमधून एनडीएमसीनं कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क प्रशासकीय कारणामुळं 16 आणि 17 ऑक्टोबर 2026 या दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Abhijeet Dipke.jpg
Abhijeet Dipke.jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ राजधानी नवी दिल्लीत 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता 'लहरा दो तिरंगा मार्च'चे आयोजन केलं आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कपासून या मार्चची सुरुवात होणार आहे. मात्र,सीजेपीच्या या तिरंगा मार्चला पहिला धक्का बसला आहे.

नवी दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिल (NDMC) नं गुरुवारी (ता.15 ऑक्टोबर) नोटीस जारी केली आहे. या नोटिसमधून एनडीएमसीनं कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क प्रशासकीय कारणामुळं 16 आणि 17 ऑक्टोबर 2026 या दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळं सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

एनडीएमसीच्या काढलेल्या नोटिशीमुळे आता कॉक्रोच जनता पार्टीवर त्यांच्या लहरा दो तिरंगा मार्चचं ठिकाण बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. अभिजीत दिपके यांनी एनडीएमसीच्या सेंट्रल पार्क बंद करण्याच्या निर्णयावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले,आम्ही 100 ठिकाणं जाहीर केली, तर नरेंद्र मोदी 100 ठिकाणं बंद करणार आहेत का..? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी दिल्ली हायकोर्टात कॅनॉट प्लेस येथील व्यापार्‍यांकडून लहरा दो तिरंगा मार्चविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सेंट्रल पार्क आंदोलनाचं ठिकाण नसून या आंदोलनामुळे या परिसरात लावण्यात येणार्‍या बॅरिकेडस् आणि काही सुरक्षिततेसाठीच्या निर्बंधांमुळं व्यावसायिक नुकसानासोबतच पादचारी आणि वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

Abhijeet Dipke.jpg
ST Strike: ऐनदिवाळीतच फडणवीस सरकारसमोर मोठं संकट? 'एसटी' कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा? भाजप आमदार पडळकरांची भूमिका आली समोर

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयानं सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्चला स्थगिती किंवा रद्द करण्याचा आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तर दुसरीकडे अभिजीत दीपके यांनी 16 ऑक्टोबरला सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चमध्ये देशभरातली नागरिकांनी सहभागी व्हावं,असं आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com