

CJP Protest : नवी दिल्लीतील जंतर-मंतर इथं सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि मोर्चा सुरु आहे. सकाळी हा मोर्चा सुरु झाल्यानंतर आंदोलकांनी संसदेकडं कूच केली. २१ दिवस या विद्यार्थ्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नसल्यानं आज सरकारनं सीजेपीच्या प्रतिनिधींना चर्चेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर अभिजीत दिपके यांचे दोन सहकारी सरकारसोबत चर्चेमध्ये सहभागी झाले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा सविस्तर तपशील सौरव दास यांनी सांगितला आहे. त्यांच्या माहितीवरुन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येण्याची शक्यता वाटते आहे.
सरकारच्यावतीनं केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या सरकारी निवासस्थानी ही बैठक पार पडली. सकाळी ११.३० वाजल्यापासून ही बैठक सुरु आहे. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता अभिजीत दिपकेंचे सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी आपल्या आंदोलनाच्या लिखित मागण्यात नड्डा यांच्यासमोर ठेवल्या. यावेळी सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घ्यावं, ज्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली त्यांना सोडून देण्यात येईल, असं नड्डा यांनी त्यांना आश्वासन दिलं. पण इतक्यावरच हे आंदोलन थांबणार नाही हे सीजेपीच्या प्रतिनिधींनी त्यांना ठामपणे सांगितलं. यावर नड्डा यांनी ही मागणी योग्य त्या ठिकाणी पोहोचवली जाईल, असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं.
या बैठकीबाबत सौरव दास यांनी सांगितलं की, आम्ही आज दिवसभरात दोन वेळा जेपी नड्डा यांना भेटलो. आम्ही दुपारी १२ वाजता नड्डा यांच्या निवासस्थानी आलो होतो. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आमची बैठक झाली. या बैठकीत आम्ही त्यांना हेच सांगितलं की आमच्या तीन प्रमुख मागण्यात आहेत. यामध्ये पहिली सोनम वांगचुक यांना तात्काळ मुक्त करण्यात यावं. जोपर्यंत त्यांना सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तोपर्यंत त्यांना एक व्हिडिओ तयार करण्याची परवानगी दिली जावी की, यात त्यांनी तरुणांना आवाहन करावं शांतता राखण्यासाठी. पण आत्तापर्यंत वांगचुक यांचा असा व्हिडिओ आलेला नाही.
त्यानंतर दुसरी मागणी म्हणजे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर आता यायलाच पाहिजे. एकतर त्यांना कॅबिनेटमधून बरखास्त करावं किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. कारण हे आंदोलन तोपर्यंत सुरुच राहील जोपर्यंत त्यांचा राजीनामा येत नाही. त्यानंतर तिसरी मागणी म्हणजे, NEET परीक्षेचा पेपर फुटल्यामुळं ज्या २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटींची नुकसान भरपाई मिळावी. याच मागण्या घेऊन आम्ही जेपी नड्डा यांच्याकडं गेलो होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.