आरेमध्येच मेट्रो कारशेड ; शिंदे-ठाकरे वाद पुन्हा पेटणार

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, अशी विनंती राज्य सरकारला उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पण रखडेला हा मेट्रो प्रकल्प मार्गी लावणारच अशी ठाम भूमिका शिंदेंनी घेतली आहे.
 Eknath Shinde, uddhav thackeray
Eknath Shinde, uddhav thackeraysarkarnama

पणजी (गोवा) : राज्यात शिंदे (cm Eknath Shinde) आणि फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच (aarey metro) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत 'आरे वाचवा' या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने कितीही प्रयत्न करू दे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आरेमधील नागरिकांनी घेतली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी देखील पत्रकार परिषदेत आरे कारशेडबाबत भाष्य केले आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, अशी विनंती राज्य सरकारला उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पण रखडेला हा मेट्रो प्रकल्प मार्गी लावणारच अशी ठाम भूमिका शिंदेंना घेतली आहे. ते पणजी येथे माध्यमांशी बोलत होते. त्यामुळे आता शिंदे-ठाकरे वाद पुन्हा पेटणार असे चित्र आहे.

मेट्रो 3 कारशेड आरेमध्ये उभारण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आरेतील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र, आरेमध्येच कारशेड उभारण्यात यावे, अशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे.

 Eknath Shinde, uddhav thackeray
फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद का दिलं ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

"शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून सरकार कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पणजी येथे पत्रकारांशी बोलत होते.

जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ते पणजी येथे आमदारांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. शिंदे हे आज मुंबईला पोहचणार असून उद्या (शनिवारी) पणजीतील आमदार हे मुंबईला पोहचणार आहेत.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकार जनतेच्या हिताचेच निर्णय घेणार," असे मुख्यमंत्री म्हणाले. १७० पेक्षा अधिक आमदार आमच्यासोबत असल्याने आम्ही बहुमत सिद्ध करणार, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

उद्यापासून (ता.२) सुरु होणारे विधानसभेचं अधिवेशन एका दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com