फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद का दिलं ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावं लागेल.
Devendra Fadnavis, cm Eknath Shinde, Prakash Ambedkar
Devendra Fadnavis, cm Eknath Shinde, Prakash Ambedkarsarkarnama

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले असले तरी राजकीय गोंधळ सुरूच आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अन्य 15 आमदारांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी करत उद्धव गटाच्या वतीने शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यावर वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी स्पष्टीकरण दिलं. (Prakash Ambedkar latest news)

आंबेडकर म्हणाले, "11 जुलै रोजी विश्वास धारक ठराव होईल असं वाटतं. गटनेत्याला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्यावेळी वाटतं की या सरकारला बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही,"

फडणवीस म्हणाले, "11 जुलै रोजी पीटिशन शिवसेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये, म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं. राज्यपालांनी बहुमत करण्याच्या सूचना दिल्या. सभागृहात कामकाज करुन अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल,"

Devendra Fadnavis, cm Eknath Shinde, Prakash Ambedkar
भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं ; आंबेडकरांचा टोमणा

"कुठल्याही पक्षात व्हीप काढणाऱ्याची नेमणूक होते ती पक्षाच्या अध्यक्षांकडे असते. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावं लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. व्हीप जो काढण्यात आला होता, त्याला डीफाय करण्यात आलं. माझ्या मते ते अॅन्टी डिफेक्शन लॉ मध्ये बसत आहे असं वाटतं," असं ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने आज नुपूर शर्मा यांना माफी मागायला सांगितले आहे. यावर ते म्हणाले, "सुप्रीम कोर्ट काही वेळा चांगल्या उद्देशाने दिशा देते. म्हणून त्यांनी नुपूर शर्मा यांना माफी मागावी असं सांगितले असावं,"

उपसभापतींनी निलंबित केलेल्या शिवसेनेच्या 16 बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली होती. सोबतच या विषयावर निर्णय होईपर्यंत फ्लोअर टेस्ट थांबवण्याची मागणीही करण्यात आली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला असून 16 आमदारांच्या निलंबन नोटीस प्रकरणात 11 जुलैलाच सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

मी फकीर : आंबेडकर

"खासदार संजय राऊत यांची आज ईडी चौकशी सुरु आहे. यावर आंबेडकर म्हणाले की माझ्याकडे कोणी आयकर विभाग, ईडी येत नाही कारण मी फकीर माणूस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com