Video Mamata Banerjee : 'मुख्यमंत्री नाही मोठी बहीण म्हणून आले', ममता बॅनर्जी आंदोलक डाॅक्टरांच्या व्यासपीठावर

Mamata Banerjee doctors forum : मी तुमच्या आंदोलनात सलाम करते. 34 दिवसापासून तुमचे धरणे आंदोलन सुरू आहे. मी सुद्धा विद्यार्थी आंदोलनातून आले आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee New : कोलकत्तामध्ये आरजी कर मेडिकल काॅलेजमध्ये महिला डाॅक्टरवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली. या विरोधात राज्यातील ज्युनिअर डाॅक्टर मागील एका महिन्यापासून आंदोलन करत आहेत.

आंदोलन करणाऱ्यांशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीला आंदोलक डाॅक्टर गेलेच नाही. दोन तास ममता बॅनर्जी डाॅक्टरांची वाट पाहत होत्या. अखेर आज (शनिवारी) ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डाॅक्टरांच्या व्यासपीठावर गेल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, इथे मी मुख्यमंत्री म्हणून आले नाही. मोठ्या बहिण्याच्या, 'दीदी'च्या नात्याने मी इथे आले आहे. मी तुमच्या आंदोलनात सलाम करते. 34 दिवसापासून तुमचे धरणे आंदोलन सुरू आहे. मी सुद्धा विद्यार्थी आंदोलनातून आले आहे. मी समजू शकते 34 दिवस आंदोलन करणे किती कठीण आहे. तुमच्या सर्व मागण्या सहानुभूतीपूर्वक ऐकल्या जातील.

Mamata Banerjee
Rahul Gandhi Caste: 'राहुल गांधी मुस्लिम आहेत की ख्रिश्चन? हे..' ; भाजप आमदाराचं मोठं विधान!

आंदोलनस्थळी पोहोचताच गोंधळ

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनस्थळी जात पत्रकार परिषद घेत डाॅक्टरांना आपला संदेश दिला. तसेच ममता बॅनर्जी जेव्हा आंदोलक डाॅक्टरांच्या व्यासपीठावर पोहोचल्या त्यावेळी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ममता यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यावेळी ममता यांनी शांत राहण्याचे तसेच त्यांनी बोलण्याची संधी देण्याचे आवाहन केले.

कामावर परत येण्याचे आवाहन

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्युनिअर डॉक्टरांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. मी एकटी सरकार चालवत नाही. मी सर्वांचा सल्ला घेईन. जर कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा होईल. मी सीबीआयला दोषींना कठोर शिक्षा देण्याची विनंती करते. तुम्ही कामावर परत या, मी तुम्हाला खात्री देतो की कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला सोडले जाणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Mamata Banerjee
Girish Mahajan News : ...तर खडसेंचे स्वागत दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून करू; गिरीश महाजनांनी चिमटा काढलाच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com