Mamta Bannerjee Vs Bjp : ममता बॅनर्जींची उघड धमकी; माझे चार तर तुमचे आठ जातील; भाजपची पोलिसात तक्रार...

CM Mamata Banerjee's Open Threat to BJP : केंद्रीय तपास यंत्रणांनी तृणमूलच्या नेत्यांना अटक केली आहे.
Mamta Bannerjee Vs Bjp :
Mamta Bannerjee Vs Bjp :Sar
Published on
Updated on

West Bengal News : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केल्यास, त्या बदल्यात भाजपच्या नेत्यांना अटक केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला, असा आरोप भाजपने केला आहे. यामुळे बंगालच्या राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. (Latest Marathi News)

Mamta Bannerjee Vs Bjp :
Mamata Banerjee ED Summons : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ; खासदार भाच्याला ईडीचे समन्स!

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले होते की, "त्यांनी (भाजपने) आमच्या चार आमदारांना तुरुंगात पाठवले, असे केले तर आमची संख्या कमी होईल, असे त्यांना वाटते. जर त्यांनी माझ्या चार लोकांना तुरुंगात टाकले तर त्याची आठ जणांना खून आणि इतर प्रकरणात तुरुंगात रवानगी करेन."

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. विविध कथित घोटाळ्यांमध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी तृणमूलच्या नेत्यांना अटक केली आहे. तृणमूलचे पाच बडे आणि दिग्गज नेते सद्यःस्थितीत न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये चार आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे.

Mamta Bannerjee Vs Bjp :
Mangalwedha Politics : शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक; भाजप नेत्याचा सरकारला घरचा आहेर

याबाबत शुभेंदू अधिकारी म्हणाले, “मी माझी तक्रार हेअर स्ट्रीट पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला ई मेल केली आहे आणि मुख्यमंत्री बॅनर्जींनी केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. आमच्या नेत्यांना (भाजप) आठ लोकांना अटक करण्याची धमकी दिली आहे. जर पश्चिम बंगाल पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला, तर 72 तास वाट पाहीन, त्यानंतर न्यायालयात धाव घेऊन तक्रार घेण्याची विनंती करणार आहे."

यातील विशेष बाब म्हणजे शुभेंदू अधिकारी यापूर्वी ममता बॅनर्जींचे सहकारी होते. टीएमसीमध्ये नेते होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा 1956 मतांनी पराभव केला होता. पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून निवडणूक लढवावी लागली.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध कथित घोटाळ्यांमध्ये अटक केलेल्या तृणमूल नेत्यांना भ्रष्टाचाराच्या गुंतवले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आज तुम्ही हसत आहात कारण आमच्या पक्षाचे नेते अनुब्रता मंडोल, पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, ज्योती प्रिया मलिक आणि इतर काही नेते तुरुंगात आहेत. आता ही परंपरा कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com