CM Mohan Yadav : भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्या गुन्हेगाराच्या घरावर बुलडोझर; मोहन यादव 'In Action Mode'

Madhya Pradesh Crime : जखमी भाजप कार्यकर्त्याची कैलाश विजयवर्गीय यांनी रुग्णालयात जाऊन केली होती विचारपूस.
CM Mohan Yadav
CM Mohan YadavSarkarnama
Published on
Updated on

Bhopal News : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मोहन यादव(Mohan Yadav) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. कारण, एका पाठोपाठ एक धडाधड निर्णय ते घेत आहेत. नुकतंच त्यांनी मशिदींवरच्या लाऊड स्पीकरवर निर्बंध घालत उघड्यावर मांस विक्रीला बंदी घातली आहे. त्यानंतर आता त्यांनी बुलडोझरची कारवाई केली आहे.

भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त करण्यात आलं आहे. भाजप कार्यकर्त्याचा हात कापणारा आरोपी फारूख राइन उर्फ मिन्नीच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर चालवण्याचा आदेश दिला गेला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Mohan Yadav
Bhajanlal Sharma : राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याअगोदर भजनलाल शर्मांनी भाजप विरुद्ध लढवली आहे निवडणूक!

यानंतर आरोपीच्या भोपाळमधील जनता कॉलिनीतील घरावर बुलडोझर चालवला गेला. आरोपी फारुख राइन याच्यावर भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर याचा हात कापल्याचा आरोप होता.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 5 डिसेंबर रोजी आरोपी फारुखने भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये देवेंद्र ठाकरू यांचा हात कापला गेल्याने, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले गेले.

जखमी देवेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी स्वत: कैलाश विजयवर्गीय रुग्णालयात पोहचले होते. आरोपी फारुखचे नाव हबीबगंज पोलिसांच्या गुंडा लिस्टमध्येही आहे. या अगोदरही त्याच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फारुख राइन, असलम, शाहरुख, बिलाल आणि समीर यांना अटक केली आहे.

CM Mohan Yadav
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांना पास का दिले, खासदार सिम्हा यांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

याशिवाय, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या राजवटीत अयोध्या काशी आणि मथुरा या तीर्थक्षेत्रांमध्ये खुल्या मांस विक्रीवर बंदी आहेच, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात बंदी लागू केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com