Madhya Pradesh CM News : ...अखेर मध्य प्रदेशबाबतचा सस्पेन्स संपला; मोहन यादव असणार नवे मुख्यमंत्री

Mohan Yadav New Chief Minister : मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार होते.
Mohan Yadav
Mohan Yadav Sarkarnama
Published on
Updated on

Bhopal News : पाच राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपने विजय मिळविलेल्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्री कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. निकालाला आठ दिवस उलटल्यानंतरही भाजपच्या मुख्यमंत्रिपदांचा चेहरा ठरत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

त्यातच छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर भाजपने आपलं धक्कातंत्र मध्य प्रदेशमध्येदेखील कायम राखत मुख्यमंत्रिपदी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Mohan Yadav
H. D. Kumaraswamy : पन्नासहून अधिक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पडणार ?

मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार होते. भाजपच्या आमदारांची दुपारी भोपाळच्या पक्ष मुख्यालयात बैठक पार पडली.या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली आहे. बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, ओबीसी मोर्चाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण आणि राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा हे उपस्थित होते. (Madhya Pradesh Chief Minister) यावेळी मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतानाच दोन उपमुख्यमंत्री म्हणून राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांच्या नावाची घोषणा केली आहे.

भाजपकडून (BJP) निवडून आलेल्या सर्व 163 आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शिवराजसिंह चौहान यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार की छत्तीसगडप्रमाणे नव्या चेहऱ्याला संधी मिळते, याकडे लक्ष लागलेले होते. मोहन यादव यांनी शिवराजसिंह चौहान (ShivrajSingh Chouhan) यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले होते. उज्जैन दक्षिणमधून यादव हे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशात 'या' नावांची होती चर्चा

पक्षाने ओबीसी प्रवर्गातील एखाद्याला मध्य प्रदेशात मुख्यमंत्री बनवल्यास शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद सिंह पटेल आणि भूपेंद्र सिंह यांच्यापैकी कोणाच्याही नावावर एकमत होऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गातून नरेंद्र सिंह तोमर, राकेश सिंग आणि विष्णू दत्त शर्मा यांच्या नावांना मंजुरी मिळू शकते. इतरांमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि राज्यसभा सदस्य सुमेर सिंह सोलंकी यांचीही नावे चर्चेत होती.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरवत आणि तब्बल 163 जागा मिळवत काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. मात्र, त्यानंतर भाजपमध्ये आठ दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन पेच निर्माण झाला होता.अखेर भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवतानाच आपलं धक्कातंत्राचा फॉर्म्युलाही कायम ठेवला.त्यात शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे.

Mohan Yadav
Hemant Patil News: हेमंत पाटलांचा राजीनामा ही नौटंकी; सत्तारांनी वात पेटवली.. पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव (Mohan Yadav) यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच पक्षनेतृत्वासह ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही जवळचे मानले जातात. भाजपच्या विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीत चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी त्यांना समर्थन दिल्यानंतर यादव यांच्या नावावर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील शिक्कामोर्तब करण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Mohan Yadav
Hemant Patil News: हेमंत पाटलांचा राजीनामा ही नौटंकी; सत्तारांनी वात पेटवली.. पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com