
Pune 27 Jan 2025: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले आहे. पक्षातील पाच नगरसेवकांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी खासदार संजय राऊत हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत देखील मानपानाचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीआज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात बोलवली आहे. संजय राऊत, सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीतून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे निघून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना माजी नगरेसवक पृथ्वीराज सुतार यांच्या शेजारी बसवले होते. मात्र, कोथरुड विधानसभा निवडणुकीत झालेल्या अंतर्गत वादामुळे मोकाटे यांचा सुतार यांच्याबाबात आक्षेप होता म्हणूनच ते बैठकीतून निघून गेले.
चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पुण्यात ठाकरे गटात जे काही नेते उरले आहेत त्यातील सर्वात जेष्ठ नेते हे चंद्रकांत मोकाटे आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे.
याबाबत बोलताना मोकाटे म्हणाले , सुषमा अंधारे या बैठक ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना मंचावर बसायला जागा नव्हती. मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि माझं निघून आलो. त्या आमच्या नेत्या आहेत त्या मंचावरचं बसणार ना.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बैठकीला पुणे शहरातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठक सुरू झाल्यानंतर वसंत मोरे हे समोर पदाधिकाऱ्यांच्या रांगेत बसलेले होते. हे पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी स्वतः वसंत मोरे यांना मंचावर बोलून घेतलं. त्यामुळे बैठकीत पुण्याच्या ठाकरेसेनेत वसंत मोरे यांचे वजन वाढल्याचं दिसले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.