Yogi Adityanath News : तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार का? ; मुख्यमंत्री योगींनी केलं मोठं विधान, म्हणाले...

Yogi on Vidhan sabha election : जाणून घ्या, योगींनी नेमकं काय म्हटलं आहे, मुख्यमंत्रिपदाबाबतही केलं आहे विधान
Yogi Adityanath rally In Maharashtra
Yogi Adityanath rally In MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Yogi election decision : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत एएनआयने जारी केला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री योगी यांनी सलग तिसऱ्यांदा गोरखपूर मधून निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. यावेळी योगींनी जे काही म्हटले त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तर योगींनी दिलेल्या उत्तरामुळे राजकीय विश्लेषकही वेगवेगळे तर्क लावत आहेत.

मुलाखतीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारले गेले की, तुम्ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहात का? त्यावर उत्तर देताना योगी म्हणाले, मी प्रयत्न करणार नाही. आमचा पक्ष प्रयत्न करेल. भाजपचा(BJP) कोणताही सदस्य मुख्यमंत्री बनू शकतो.

Yogi Adityanath rally In Maharashtra
Yogi government : योगी सरकारला आठ वर्षे पूर्ण; जाणून घ्या, महत्त्वपूर्ण कामे

याशिवाय जेव्हा योगींना त्यांच्या सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धीबाबत विचारले गेले, तेव्हा योगी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही बघा. कृषी, तरूणांशी निगडीत असणारे क्षेत्र, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, कायदा व सुव्यवस्था, पर्यटन किंवा मग वारसा आणि विकासातील उत्तम समन्वय असेल त्याचे देशभरातील सर्वात उत्कृष्ट उदाहरण हे उत्तरप्रदेशच असेल.

याशिवाय मुख्यमंत्री योगींनी मुलाखतीत महाकुंभला मृत्युकुंभ म्हटल्याबाबतही विरोधकांना उत्तर देत म्हटले की,  हा मृत्युंजय महाकुंभ होता, मृत्युकुंभ नव्हता. त्यांनी म्हटले की पश्चिम बंगालमधून दररोज जवळपास ५० हजार ते एक लाख भक्त महाकुंभात पवित्र डुबकी मारण्यास येत होते. तसेच त्यांनी महाकुंभाबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या विधानांवर टीकाही केली

Yogi Adityanath rally In Maharashtra
Kangana Ranaut on Kunal Kamra : कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर कंगना रनौतची 'रोखठोक' प्रतिक्रिया, म्हटले...

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना कॉमेडियन कुणाल कामराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आल्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. पण दुर्दैवाने काही लोक समाजा आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत". कुणालाही समाज तोडण्याची किंवा विशिष्ट व्यक्तीवर अशोभनीय टिप्पणी करण्याचा अधिकार नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)



सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com