

Vijeta Dahiya remove from CJP: जंतर-मंतरवर सोमवारी देशभरातून लाखभर तरुण दाखल झाले होते, त्यांनी उत्स्फुर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. यावेळी पोलिसांनी या तरुणांवर अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. अनेक तरुणींनाही यावेळी मारहाण झाल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. याच दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता विजेयता दहिया याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळं सीजेपीनं याची तत्काळ दखल घेत विजेताला आपल्या पदावरुन दूर केलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवर या घटनेची माहिती दिली आहे. यात म्हटलं की, आम्ही आमचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्या अत्यंत असंवेदनशील कृत्याचा निषेध करतो. विजेताचा व्हिडिओ तेव्हा समोर जेव्हा शांततापूर्ण आंदोलक आणि आमची टीम, पोलिसांद्वारे मारहाणीचा सामना करत होती. त्याचवेळी दहिया यांची कृती अस्विकृत होणारी होती. यामध्ये विवेकाची कमी असल्याचं दिसून आलं तसंच आमच्या आंदोलनाच्या मुल्यं आणि सिद्धांतांच्या पूर्णपणे विपरित आहे. त्यामुळं दहिया यांना प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना पार्टीच्या सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आलं आहे.
दिल्लीत आंदोलनात पोलिसांकडून तरुणांवर लाठ्या बरसत असताना विजेता दहिया बर्गर खात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. म्हणजेच एकीकडं अन्न-पाण्याशिवाय सर्व तरुण वर्ग झगडत असताना दुसरीकडं स्वतः कॉक्रोच पार्टीचा सदस्य आणि मुख्य प्रवक्त्यानं अशा प्रकारे स्वतःची पेटपुजा करण्याचा प्रकार निंदणीय असल्याच्या प्रतिक्रिया यायला लागल्या होत्या. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील विजेता दहिया याच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, सीजेपीचे प्रवक्ते विजेता दहिया हे व्यासपीठावर कायम नाचत असतात. तसंच त्यांनी स्वामी प्रेमानंद महाराज यांना अपशब्द वापरले होते. दहिया यांनी कालच्या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता का? हे खरं आहे का?
आंदोलनादरम्यान बर्गर खाल्याबद्दल विजेता दहिया यांना सीजेपीच्या मुख्य प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आल्यानंतर दहिया यांनी स्वतः आपल्या या कृतीचं समर्थन करत त्यामागचं कारणंही सांगितलं आहे. दहिया यांनी म्हटलं की, मी बर्गर का खाल्लं? आजचा हाच मोठा मुद्दा आहे. कुठलीही व्यक्ती बर्गर का खाते? त्याला भूक लागलेली असते किंवा त्याची बर्गर खाण्याची इच्छा झालेली असते.
पण यासाठी मला तुम्ही इतकं जबाबदार धरता आहात. म्हणजे ही काय नोकरी आहे का आंदोलकांची? तुम्ही मला या पदावर निवडून दिलंय का? तुम्ही खरंतर सरकारला जबाबदार धरायला पाहिजे. त्यामुळं तुमची ही जी काही नॉनसेन्स थिकिंग आहे ना यात मला फसायचं नाही. मला काही राजकारणात यायचं नाही. म्हणजे मला तुमच्यासारख्या मुर्खांना खूश करावं. ठीक आहे मी जे काही करतो आहे ते देशासाठी करतो आहे स्वतःच्या मर्जीनं करतो आहे. त्यामुळं मी कोणाहीसाठी जबाबदार नाही, त्यामुळं मी बर्गरही खाणारचं!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.